मुंबई - जेव्हा नसरापूरसारख्या घटना जेव्हा घडतात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील चौरंगा करण्याची शिक्षा आठवते. अर्थात् आजचा काळ वेगळा आहे आणि तेव्हाचा काळ वेगळा होता.
असे असले, तरी पोलीस, सरकार आणि न्यायालय आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. जलद गती न्यायालयात हा खटला चालवावा आणि पीडितेच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय द्यावा. आरोपीला कठोर आणि रोखठोक शिक्षा झाली, तर असे काही करण्याचा विचारसुद्धा दुसरे कुणी करणार नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेते रितेश देशमुख यांनी दिली आहे.

