Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देहलीतील मंदिरांना लक्ष्य करण्याच्या सिद्धतेत असणार्‍या ९ जणांना अटक !

देहलीतील मंदिरांना लक्ष्य करण्याच्या सिद्धतेत असणार्‍या ९ जणांना अटक !

(आय.एस्.आय. म्हणजे इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स - आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा)

नवी देहली - देहली पोलिसांच्या विशेष पथकाने ९ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून शस्त्रे, हँड ग्रेनेड, स्फोटके आदी शस्त्रसाठा जप्त केला.

हे सर्व जण पाकची गुप्तचर संस्था 'आय.एस्.आय.' आणि कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम टोळीसाठी काम करत होते. देहलीतील महत्त्वाची ठिकाणे, सुरक्षा कर्मचारी आणि धार्मिक स्थळे यांवर आक्रमण करण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. अटक केलेल्या व्यक्तींचा पंजाब, देहली आणि मुंबई या ठिकाणांशी संबंध आहे. यात एका विदेशी व्यक्तीचाही समावेश आहे. देहली पोलीस याविषयी पत्रकार परिषद घेऊन विस्तृत माहिती देणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi