Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देशभक्त गौतम खट्टर यांची गोव्यातील अटक लज्जास्पद ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

देशभक्त गौतम खट्टर यांची गोव्यातील अटक लज्जास्पद ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी

सांगली, ४ मे (वार्ता.) - प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि देशभक्त गौतम खट्टर यांना गोवा येथे झालेली अटक अत्यंत लज्जास्पद आहे. फ्रान्सिस झेविअर हा केवळ क्रूरकर्मा नसून देशाचा शत्रू होता. अशा व्यक्तीचा इतिहासामध्ये 'देशद्रोही आणि धर्मद्रोही' म्हणूनच उल्लेख व्हायला हवा, असे विधान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू.

संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले होते. 'खट्टर यांची तात्काळ सुटका करण्यात यावी', अशी मागणीही त्यांनी त्या वेळी केली होती.

🚨 The arrest of patriot @GautamKhattar in Goa is shameful - Pujya Sambhajirao Bhide Guruji

Demands the closure of educational institutions named after "cruel" figures like Francis Xavier

After bail, Gautam Khattar visited Sangli to seek Guruji's blessings

Stopping the… https://t.co/EMlTOR423cpic.twitter.com/IDLWXoybiT

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

पू. भिडेगुरुजी म्हणाले,

''फ्रान्सिस झेविअरने गोव्यात केलेले धर्मांतर आणि अत्याचार यांचा इतिहास लपवून त्याला 'संत' म्हणणे चुकीचे आहे. इतिहासातील त्याचा उल्लेख 'देशद्रोही' असाच असायला हवा आणि तसाच इतिहास पुढच्या पिढ्यांना शिकवला गेला पाहिजे. झेविअरच्या नावाने चालवल्या जाणार्‍या शाळा म्हणजे उघडपणे देशद्रोहच आहे. अशा शाळांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.''

देशभक्त गौतम खट्टर यांनी घेतले पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद !

देशभक्त गौतम खट्टर यांना जामीन मिळताच त्यांनी सांगली येथे येऊन गुरुवर्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी विविध मान्यवर आणि धारकरी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi