मुंबई - पोलिसांच्या वाहनावर आरोपीने दगडफेक केल्याने वाहनाची काच फुटली. धारावी परिसरात रात्री ११ वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी करण जाधव याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अद्याप तो पसार आहे.
जाधव याने तिघांना दाढी करण्याचे ब्लेड देण्याच्या कारणावरून मारहाण केल्याची माहिती मिळाली होती. याविषयीची तक्रार करणार्याला पोलीस वाहनातून पोलीस ठाण्यात आणत होते. त्या वेळी जाधव याने हा प्रकार केला.

