'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'ने 'बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)' या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
'३१ मे हा 'जागतिक तंबाखूविरोधी दिन' (World No Tobacco DDaayy) म्हणून साजरा केला जातो.
यानिमित्त महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने 'धूम्रपान केल्यानंतर' व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांवर काय परिणाम होतो ?' याचा अभ्यास करण्यात आला. यासाठी २२.५.२०२६ या दिवशी एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात (एरव्ही धूम्रपान न करणार्या आणि केवळ गुरूंच्या संशोधनकार्यात आपली सेवा म्हणून) सहभागी असलेल्या साधकाने सिगारेटचे ८ झुरके घेतले. या प्रयोगातील मोजणीच्या नोंदी घेण्यासाठी 'बायो-वेल जी.डी.व्ही.' (टीप १) या वैज्ञानिक उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या उपकरणाद्वारे व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांची स्थिती अभ्यासता येते.
३० मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण 'बायो-वेल जी.डी.व्ही.' या उपकरणाद्वारे मिळालेल्या चित्रातील सप्तचक्रांचा आकार आणि स्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे अन् 'धूम्रपान करणे' याचा साधकाच्या प्रत्येक चक्रावर झालेल्या परिणामांचा केलेला तुलनात्मक अभ्यास' वाचला होता. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
भाग २
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा→ https://sanatanprabhat.org/marathi/1045268.html
रशियातील डॉ. कॉन्स्टनटीन कोरोटकोव्ह यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी 'गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायजेशन' या तंत्रज्ञानावर आधारित 'बायो-वेल' हे उपकरण बनवले आहे. व्यक्तीच्या ऊर्जेचे परीक्षण करण्यास उपयुक्त असा एक छायाचित्रक (कॅमेरा) आणि संगणकीय प्रणाली यात वापरलेली आहे. या उपकरणाद्वारे परीक्षण करतांना व्यक्तीच्या हाताच्या प्रत्येक बोटाला एक वेदनारहित हलकासा विद्युत् झटका एका सेकंदापेक्षाही अल्प कालावधीसाठी दिला जातो. त्यामुळे व्यक्तीच्या त्वचेतून 'फोटॉन' आणि 'इलेक्ट्रॉन' या अतीसूक्ष्म कणांच्या होणार्या प्रक्षेपणास चालना मिळते. प्रत्येक बोटातून होणार्या 'फोटॉन' कणांच्या प्रक्षेपणाची छायाचित्रे 'बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)' या उपकरणातील छायाचित्रकाद्वारे टिपली जातात आणि त्याच्या आधारे संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने व्यक्तीचे ऊर्जाक्षेत्र अन् तिची कुंडलिनीचक्रे यांची माहिती मिळते.
३ अ. धूम्रपान करणे
३ अ १. धूम्रपान करण्यापूर्वी साधकाच्या कुंडलिनीचक्रांची स्थिती चांगली असणे

३ अ १ अ. धूम्रपान करण्यापूर्वी साधकाची ३ चक्रे मध्यरेषेलगत असणे : हे साधक वर्ष २०१७ पासून पुढील ३-४ वर्षे ध्यान साधना करत होते. त्यानंतर त्यांनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना आरंभ केली. वर्ष २०२१ मधे ते सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करू लागले. ही साधना हे 'त्यांची कुंडलिनीची सहस्रार, आज्ञा आणि मूलाधार ही ३ चक्रे मध्यरेषेलगत, म्हणजे ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्याच्या स्थितीत असण्यामागचे आध्यात्मिक कारण आहे.' आध्यात्मिकदृष्ट्या ही चांगली स्थिती आहे.
३ अ १ आ. प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन मनात गायल्यावर धूम्रपान करण्यापूर्वी साधकाची ४ चक्रे अकार्यरत असणे : रामनाथी येथील सनातनच्या आश्रमापासूून थोड्या अंतरावर नागेशी येथे दुसर्या ठिकाणी प्रयोगासाठी येत असतांना साधकाच्या मनात आपोआप प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेले 'चिंता करू मी कशाला, माझी काळजी देवाला', हे भजन आपोआप घोळत होते. खरेतर 'हे भजन मी फारसे कधी गायलेले नाही', असे त्यांनी सांगितले. मन भजनात रमले असल्यामुळे प्रयोगापूर्वी हे साधक अंतर्मुख होते. त्यामुळे त्यांची उर्वरित ४ चक्रे अकार्यरत स्थितीत आढळली. हीसुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या चांगली स्थिती आहे.

३ अ २ अ. सर्वच चक्रांचे आकार वाढणे : धूम्रपानामुळे त्रासदायक शक्तीचा परिणाम सर्व चक्रांवर होऊन सर्व चक्रांना नकारात्मक ऊर्जा मिळाल्याने सर्वच चक्रांचे आकार वाढले.
३ अ २ आ. त्रासदायक शक्ती मिळाल्यामुळे ४ चक्रे अकार्यरत होणे : त्रासदायक शक्तीचा परिणाम होऊन सहस्रार, मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार ही ४ चक्रे अकार्यरत झाली.
३ अ २ इ. तीन चक्रे भासमान कार्यरत होणे : धूम्रपान करणार्या सामान्य व्यक्तीमध्ये 'धूम्रपान केल्याने आपली निराशा किंवा ताण दूर होऊन आपल्याला उत्सह वाटेल', असा भ्रम असतो. त्याप्रमाणे व्यक्तीला भासमान उत्साह वाटतो. प्रयोगातील साधकाच्या काही चक्रांवरही असाच भासमान परिणाम दिसून त्याची आज्ञा आणि विशुद्ध ही चक्रे कार्यरत झाली, तर अनाहतचक्राची अकार्यरतता थोडीशी अल्प झाली.

३ अ ३ अ. धूम्रपानाचा त्रासदायक परिणाम ७ पैकी ६ चक्रांवर दिसून त्यांचा आकार आणखी वाढणे : सहस्रार, आज्ञा, विशुद्ध, मणिपूर, स्वाधिष्ठान आणि मूलाधार या चक्रांना त्रासदायक शक्ती मिळून त्यांचा आकार आणखी वाढला. याचा अर्थ धूम्रपान केल्यावर १० मिनिटे होऊनही अजूनही त्या साधकावर त्रासदायक परिणाम होतच होता.
३ अ ३ आ. अनाहतचक्राने सर्वप्रथम धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीशी लढायला आरंभ करणे : साधकातील चैतन्याने अनाहतचक्राच्या माध्यमातून सर्वप्रथम धूम्रपानातील त्रासदायक शक्तीशी लढायला आरंभ केला. त्यामुळे त्या चक्रामधील त्रासदायक शक्ती थोड्या प्रमाणात न्यून होऊन त्या चक्राचा आकार थोडासा अल्प झाला. तसेच त्या चक्राने आपली अकार्यरतता थोडी वाढवून बचावात्मक धोरण स्वीकारले.
३ अ ३ इ. वेगळी ३ चक्रे भासमान कार्यरत होणे : धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीचा परिणाम होऊन आता सहस्रार, स्वाधिष्ठान आणि मूलाधार ही ३ वेगळी चक्रे भासमान कार्यरत झाली.
आधीच्या (धूम्रपानानंतरच्या लगेचच्या) टप्प्याला भासमान कार्यरत झालेली आज्ञा आणि विशुद्ध या चक्रांचे भासमान कार्यरत होणे आता या (धूम्रपान केल्यावर १० मिनिटांनंतरच्या) टप्प्याला थांबले. त्यांपैकी आज्ञाचक्राची कार्यरतता थोडी अल्प झाली, तसेच विशुद्धचक्राची कार्यरतता आधी होती, तेवढीच राहिली. याउलट अनाहतचक्राने या टप्प्याला त्रासदायक शक्तीविरुद्ध लढायला आरंभ केला.

३ अ ४ अ. या टप्प्याला सहस्रार, आज्ञा, मणिपूर आणि मूलाधार या आणखी ४ चक्रांनी धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीशी लढायला आरंभ करणे अन् त्यामुळे त्यांच्यावर झालेले परिणाम
१. लढायला आरंभ केल्यामुळे सहस्रार, आज्ञा, मणिपूर आणि मूलाधार या ४ चक्रांतील त्रासदायक शक्ती न्यून होऊन त्यांचे आकार न्यून झाले.
२. सहस्रार, आज्ञा आणि मूलाधार या ३ चक्रांची कार्यरतता अल्प झाली. याचा अर्थ त्यांनी बचावात्मक धोरण स्वीकारले.
३. मणिपूरचक्राची अकार्यरतता थोडी अल्प झाली. याचा अर्थ ते अधिक जोर लावून लढू लागले.
३ अ ४ आ. अनाहतचक्रही धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीशी लढत असल्याने त्याचा आकार अल्प झाला आणि ते आता बचावात्मक धोरण सोडून लढण्यासाठी कार्यरत झाले.
३ अ ४ इ. विशुद्ध आणि स्वाधिष्ठान या चक्रांवर धूम्रपानाचा त्रासदायक परिणाम अजूनही होतच असणे : धूम्रपान करून २० मिनिटे होऊनही अजूनही विशुद्ध आणि स्वाधिष्ठान या चक्रांवर धूम्रपानाचा त्रासदायक परिणाम होतच असल्याने त्या चक्रांचे आकार आणखी वाढले.
३ अ ४ ई. आधीच्या टप्प्याला भासमान कार्यरत झालेले स्वाधिष्ठानचक्र आता अकार्यरत होणे : याचा अर्थ त्या चक्रावरचा भासमान परिणाम आता थांबला होता.

३ अ ५ अ. आता उर्वरित विशुद्ध आणि स्वाधिष्ठान ही चक्रेही धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीशी लढू लागणे : या टप्प्याला विशुद्ध आणि स्वाधिष्ठान ही चक्रेही चैतन्याच्या बळावर लढू लागल्याने त्यांच्यातील त्रासदायक शक्ती अल्प होऊन त्यांचे आकार आता न्यून झाले, तसेच ती चक्रे बचावात्मक धोरण स्वीकारून अकार्यरत झाली.
याचा अर्थ धूम्रपानानंतर ३० मिनिटांनंतरच्या टप्प्याला आता सर्वच चक्रे धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीशी लढू लागली. यातून लक्षात येते, 'धूम्रपानाचा त्रासदायक परिणाम साधकाच्या शरिरावर साधारण ३० मिनिटे होत होता.'
३ अ ५ आ. सहस्रार, आज्ञा, मणिपूर आणि मूलाधार या चक्रांचे आकार वाढणे : सहस्रार, आज्ञा, मणिपूर आणि मूलाधार ही चक्रे चैतन्याच्या स्तरावर धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीशी लढत होती. त्यामुळे त्या चक्रांना चैतन्य मिळून त्यांचा आकार वाढला. या चक्रांचा अजूनही बचावात्मक पवित्रा असल्याने अजूनही ती चक्रे अकार्यरत राहूनच लढत होती.
३ अ ५ इ. अनाहतचक्राचा आकार न्यून आणि ते अकार्यरत होणे : अनाहतचक्राने सर्वप्रथम धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीशी लढायला प्रारंभ केला. त्यासाठी ते कार्यरतही झाले होते. आता अन्य सर्व चक्रे लढायला सिद्ध झाल्याने अन् अनाहतचक्राची चांगली ऊर्जा लढण्यामध्ये व्यय झाल्याने आता त्याचा आकार थोडासा न्यून झाला. त्यामुळे त्याने आता बचावात्मक धोरण स्वीकारले अन् ते अकार्यरत झाले.

वरील सारणीवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.
अ. साधकाच्या साधनेमुळे त्याच्यामध्ये धूम्रपान करण्यापूर्वी नकारात्मक ऊर्जा नव्हती. त्याच्यातील सकारात्मक ऊर्जाही चांगली होती.
आ. धूम्रपान केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आली आणि त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाली. पुढे त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.
इ. धूम्रपान केल्यानंतर २० मिनिटांपर्यंत त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा वाढत गेली.
ई. धूम्रपान केल्यानंतर ३० मिनिटांनी साधकातील नकारात्मक ऊर्जा थोडी अल्प झाली आणि त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा थोड्या प्रमाणात निर्माण झाली.
उ. 'बायो-वेल जी.डी.व्ही.' या उपकरणाद्वारे साधकाच्या केलेल्या चाचणीतही २० मिनिटांपर्यंत धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीचा त्रास साधकाच्या चक्रांना जाणवत होता', हेच दिसून आले.
ऊ. 'बायो-वेल जी.डी.व्ही.' या उपकरणाने ३० मिनिटांनंतर साधकाच्या केलेल्या चाचणीत 'त्याची त्या वेळी सर्व चक्रे धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीशी लढू लागली', हेही दिसून आले. त्यामुळे त्या वेळी त्याच्यामधील नकारात्मक शक्ती अल्प होऊन त्याच्यामध्ये पुन्हा सकारात्मक शक्ती येऊ लागली, हे लोलकाने केलेल्या परीक्षणात दिसून आले.
यावरून लक्षात आले, 'बायो-वेल जी.डी.व्ही.' या उपकरणाद्वारे केलेले परीक्षण आणि लोलकाने केलेले परीक्षण मिळते-जुळते आहे.'
अ. अनेक वर्षे चिकाटीने आणि सातत्याने साधना केल्यास कुंडलिनीचक्रांची स्थिती चांगली रहाते. कुंडलिनीचक्रे व्यक्तीच्या सर्व शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक कार्यांसाठी सूक्ष्म ऊर्जा पुरवत असल्यामुळे 'कुंडलिनीचक्रांचे कार्य उत्तम असणे', हा जीवनातील प्रत्येक अंगाच्या यशासाठीचा एक अत्यावश्यक आणि अनिवार्य घटक आहे. अर्थात ज्याच्या कुंडलिनीचक्रांचे कार्य चांगले, त्याच्या जीवनातील यशस्वीतेची हमी अधिक !
आ. काही वर्षांच्या पूर्णवेळ साधनेमुळे असलेली कुंडलिनीचक्रांची चांगली स्थितीही सिगारेटचे केवळ ८ झुरके घेतल्यानंतर किती बिघडते, तसेच त्याचा परिणाम किती कालावधीपर्यंत टिकून रहातो, हे या प्रयोगातून दिसून आले.
इ. 'सप्तचक्रांवर धूम्रपानाचा नकारात्मक (त्रासदायक) परिणाम कसा होतो ?', हे या प्रयोगातून लक्षात येते.
ई. 'धूम्रपानाच्या त्रासदायक शक्तीमुळे चक्र भासमान कार्यरत होणे, हा परिणामही होतो', हेही या प्रयोगातून सिद्ध झाले. सर्वच चक्रे कोणत्या ना कोणत्या टप्प्याला भासमान कार्यरत झाली.
उ. धूम्रपान केल्यानंतर सहस्रार आणि मणिपूर या चक्रांचा आकार सर्वांत जास्त वाढला. याचा अर्थ या चक्रांनी सर्वांत जास्त त्रासदायक शक्ती ग्रहण केली. त्यामुळे धूम्रपानाचा सर्वाधिक हानीकारक परिणाम साधकाच्या ईश्वरी तत्त्व ग्रहण करणे आणि पचन करणे, ही कार्ये अल्प होण्यावर झाला. ही महत्त्वाची कार्ये आहेत !
ऊ. या प्रयोगातून लक्षात येते, 'प्रत्येक चक्र कसे टप्प्याटप्प्याने लढायला आरंभ करते !' प्रथम कोणते चक्र लढायला आरंभ करणार आणि टप्प्याटप्प्याने अन्य चक्रेही कशी क्रमाने लढणार, हे प्रत्येक व्यक्तीच्या चक्रांच्या क्षमतेवरून ठरते.
ए. धूम्रपान केल्यानंतर कुंडलिनीचक्रांवर त्रासदायक परिणाम होत रहाण्याचा कालावधी साधारण ३० मिनिटे होता. हेही प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता, साधना, तिला असलेला आध्यात्मिक त्रास इत्यादी घटकांवर अवलंबून आहे.
ऐ. व्यक्तीला आध्यात्मिक त्रास नसणे आणि तिची साधना चांगली असणे, यांमुळे ती हानीकारक, म्हणजे रज-तमात्मक वातावरणातही टिकून राहू शकते. यावरून या दोन्ही घटकांचे जीवनातील महत्त्व लक्षात येते.
या प्रयोगातून धूम्रपानाचा व्यक्तीच्या कुंडलिनीचक्रांवर, म्हणजेच तिच्या जीवनाच्या ऐहिक, तसेच पारमार्थिक अंगांवर हानीकारक परिणाम होतो, हे लक्षात येते.'
(समाप्त)
- (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रामधील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ) आणि डॉ. (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.५.२०२६)

