Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ध्वनीक्षेपक समयमर्यादेपेक्षा अधिकची २ मिनिटे चालू ठेवणे, हा गुन्हा नाही ! - कर्नाटक उच्च न्यायालय

ध्वनीक्षेपक समयमर्यादेपेक्षा अधिकची २ मिनिटे चालू ठेवणे, हा गुन्हा नाही ! - कर्नाटक उच्च न्यायालय

बेंगळुरू (कर्नाटक) - येथे ५ मे २०२३ या दिवशी निवडणूक प्रचाराच्या वेळी रात्री १० वाजल्यानंतर पुढे २ मिनिटे ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) वापरल्याच्या आरोपावरून बिदरचे काँग्रेस आमदार रहीम खान यांच्या विरोधातील फौजदारी कारवाई रहित केली.

राज्यात रात्री १० वाजेपर्यंतच ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याची अनुमती आहे. न्यायमूर्ती एम्. नागप्रसन्ना यांनी आमदाराची याचिका स्वीकारत स्पष्ट केले की, 'ध्वनीक्षेपकाचा वापर १० वाजून २ मिनिटांपर्यंत चालू राहिल्याचा आरोप, हा गुन्हा ठरू शकत नाही. ही कथित चूक ठरवण्यासाठी कोणते घड्याळ प्रामाणित मानले गेले, याचा उल्लेख नाही.' 'फ्लाइंग स्क्वॉड'च्या तक्रारीवरून बिदर ग्रामीण पोलिसांनी आमदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.

राज्यातील काँग्रेस सरकारने आमदार रहीम खान यांच्या विरोधातील फौजदारी कारवाई रहित करण्याला विरोध दर्शवला. न्यायालयात युक्तीवाद करतांना राज्याचे अतिरिक्त अधिवक्ते म्हणाले की 'याचिकाकर्त्याने (आमदार खान यांनी) रात्री १० वाजेनंतर ध्वनीक्षेपक वापरणे चालू ठेवले होते कि नाही ? आणि असल्यास किती वेळ ?, ही गंभीर वादाची सूत्रे आहेत. त्यामुळे या टप्प्यावर कारवाई रहित करू नये. तथापि 'केवळ २ मिनिटांच्या फरकावरून फौजदारी गुन्हा ठरवता येणार नाही', असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ही संपूर्ण कारवाई रहित केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi