Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दीड वर्षानंतर वाशी-तुर्भे लिंक रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण !

दीड वर्षानंतर वाशी-तुर्भे लिंक रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुरुस्ती पूर्ण !

वाशी - दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेली वाशी-तुर्भे लिंक रोड पुलाची ठाणेकडील मार्गिका दीड वर्षानंतर चालू करण्यात आली आहे. याविषयी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. १२ कोटी रुपयांहून अधिक रक्कम या कामासाठी खर्च करण्यात आली आहे.

एन्.एम्.एम्.टी. तुर्भे डेपो समोर वाशी-तुर्भे मार्गाला जोडणारा उड्डाणपूल सिडकोने बांधला आहे. सध्या तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

येथील उड्डाणपुलाचा एक भाग सुटलेल्या अवस्थेत असल्याचे पालिकेला जून २०२४ मध्ये लक्षात आले. संरचना सल्लागारांनी पहाणी करून त्याच्या दुरुस्तीचा अहवाल दिला होता. दुरुस्ती होईपर्यंत तेथील वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आली होती. दुरुस्तीसाठी विलंब झाल्याने प्रवाशांना वेगळ्या मार्गांनी ये-जा करावी लागत होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi