Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Eid in private school : शाळेत साजरा केला जाणारा ईदचा कार्यक्रम रहित !

Eid in private school : शाळेत साजरा केला जाणारा ईदचा कार्यक्रम रहित !

चिक्कमगळुरू (कर्नाटक) - येथील एका खासगी शाळेत 'ईद' साजरी करण्याच्या निर्णर्याच्या विरोधात विद्यार्थ्यांचे पालक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संताप व्यक्त केला. २९ ऑगस्ट या दिवशी 'आज शाळेत ईद साजरी केली जाईल, तसेच या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना झब्बा (सदरा) घालून यावा', असा संदेश व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आला होता.

याला विरोध करत विद्यार्थ्यांचे पालक आणि हिंदु संघटना यांनी शाळेसमोर एकत्र येत आक्षेप नोंदवला. 'कुठल्या कारणासाठी ईद साजरी करत आहात?', असा प्रश्न हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिक्षकांना विचारला. त्यामुळे शाळेत होणारा ईदचा कार्यक्रम व्यवस्थापन मंडळाने रहित केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi