Dailyhunt
गर्भधारणेपूर्व शरीर आणि मन यांची सिद्धता : आयुर्वेदाचे मार्गदर्शन

गर्भधारणेपूर्व शरीर आणि मन यांची सिद्धता : आयुर्वेदाचे मार्गदर्शन

जच्या काळात अनेक दांपत्य गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात; परंतु योग्य सिद्धता न करता गर्भधारणा झाल्यास पुढे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदानुसार निरोगी, बुद्धीमान आणि सुदृढ संततीसाठी गर्भधारणेपूर्व सिद्धता (Preconception Care) अत्यंत महत्त्वाची मानली आहे.

ही संकल्पना आयुर्वेदात 'गर्भाधान संस्कार' म्हणून वर्णन केली आहे.

लेखांक १२ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1034643.html

गर्भधारणेपूर्व शरीर, मन आणि प्रजनन प्रणाली शुद्ध अन् सक्षम करण्याची प्रक्रिया, म्हणजे गर्भधारणेपूर्व सिद्धता होय. आयुर्वेदानुसार गर्भधारणेसाठी ऋतू (योग्य काळ), क्षेत्र (गर्भाशय), बीज (अंड अन् शुक्र) आणि अंबु (पोषण), हे ४ महत्त्वाचे घटक आवश्यक आहेत. या चारही घटकांची शुद्धता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी पूर्वसिद्धता आवश्यक असते.

अ. गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी

आ. गर्भपाताचा धोका अल्प करण्यासाठी

इ. निरोगी आणि बुद्धीमान संततीसाठी

ई. आईच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी

अ. पाळी अनियमित असणे

आ. पांढर्‍या पाण्याचा त्रास

इ. थकवा आणि अशक्तपणा

ई. वजन वाढ किंवा न्यून होणे

उ. ताण अन् झोपेचा अभाव

ऊ. पूर्वी गर्भपात किंवा 'इन्फर्टिलिटी हिस्ट्री' (infertility history)

गर्भधारणेपूर्व सिद्धतेची आवश्यकता खालील कारणांमुळे निर्माण होते -

अ. मंद अग्नी आणि आम संचय : पोषण योग्य होत नाही.

आ. दोष असंतुलन (वात-पित्त-कफ)

इ. आर्तव वह स्रोतस दुष्टी : प्रजनन क्षमता अल्प होते

ई. अपान वात विकृती : गर्भधारणेत अडथळा

उ. मानसिक ताण : 'हार्मोनल' (संप्रेरके) संतुलन बिघडते

उपचार चालू करण्यापूर्वी वैद्य खालील गोष्टींचा सखोल विचार करतात :

अ. स्त्री आणि पुरुष दोघांची प्रकृती

आ. मासिक पाळी अन् 'ओव्ह्युलेशन हिस्ट्री' (स्त्रीबीज उत्सर्जनाचा इतिहास)

इ. पचनशक्ती (अग्नी) आणि आम स्थिती

ई. वजन, झोप आणि मानसिक स्थिती

उ. पूर्वीचे उपचार किंवा गर्भपाताचा इतिहास

शरीर शुद्धी + दोष संतुलन + बीज गुणवृद्धी + मन स्थिरता

अ. वमन / विरेचन

आ. बस्ती

इ. आवश्यकतेनुसार पंचकर्म

यामुळे शरिरातील दोष आणि आम न्यून होतात.

शतावरी, अश्वगंधा, विदारीकंद आणि गुडुची ही औषधे शरिराला पोषण देऊन प्रजनन क्षमता वाढवतात; पण ही औषधे वैद्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.

अ. प्रतिदिन सकाळी कोमट पाणी पिणे

आ. दूध + तूप यांचा आहारात समावेश

इ. ३० मिनिटे चालणे / योग

ई. प्राणायाम आणि ध्यान

उ. रात्री १० किंवा ११ वाजेपर्यंत झोपणे

अ. सत्त्वयुक्त, ताजे आणि गरम अन्न, दूध, तूप, फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य घ्यावे.

आ. 'जंक फूड' (पिझ्झा, बर्गर) थंड पेये, अधिक तिखट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ अन् अनियमित झोप टाळावी.

गर्भधारणा ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी तिची योग्य सिद्धता केल्यास परिणाम अधिक उत्तम मिळतात. आयुर्वेद शरीर आणि मन या दोन्हींची सिद्धता करून निरोगी संततीसाठी योग्य पाया सज्ज करतो. योग्य आहार, संतुलित जीवनशैली आणि वैद्यकीय मार्गदर्शन यांच्या साहाय्याने गर्भधारणा अधिक सुरक्षित अन् यशस्वी होऊ शकते.

- वैद्या (सौ.) सारिका नीलेश लोंढे, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल, भोसरी, पुणे.

लेखांक १४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1039167.html

🪷'स्त्री रोग आणि आयुर्वेद' या मालिकेतील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा🪷

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi