Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी गोवा रेल्वे पोलिसांकडून कडक पडताळणी

घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी गोवा रेल्वे पोलिसांकडून कडक पडताळणी

डगाव, २७ मे (वार्ता.) - राज्यव्यापी सुरक्षा उपक्रमांतर्गत गोव्यातील रेल्वे पोलिसांनी रेल्वेमार्गे राज्यात प्रवेश करणार्‍या घुसखोर बांगलादेशी नागरिकांना ओळखण्यासाठी प्रमुख रेल्वेस्थानकांवर प्रवासी पडताळणी मोहीम तीव्र केली आहे.

ही विशेष पडताळणी मोहीम दक्षिण गोव्यातील मडगाव आणि उत्तर गोव्यातील थिवी रेल्वेस्थानकांवर रेल्वे पोलीस अन् रेल्वे सुरक्षा दल यांनी संयुक्तपणे राबवली. ही मोहीम राबवतांना अधिकार्‍यांनी देहली, बिहार आणि उत्तरप्रदेश यांसारख्या राज्यांतून येणार्‍या गाड्यांमधील प्रवाशांची ओळखपत्रे अन् प्रवासाच्या नोंदी पडताळल्या. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रवाशांचे राष्ट्रीयत्व आणि कायदेशीर प्रवासाची स्थिती निश्चित करणे, हा या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश होता.

रेल्वे पोलीस कर्मचार्‍यांनी गाड्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवून प्रवाशांना प्रवासाच्या कालावधीत कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ कळवण्याचे आवाहन केले. वैध कागदपत्रे किंवा अधिकृत अनुमतीविना भारतात प्रवेश करणार्‍या किंवा वास्तव्य करणार्‍या व्यक्तींवर 'इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट २०२५' या कायद्याच्या अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi