Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'गोकुळ'साठी 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' या पॅनलची अधिकृत घोषणा

'गोकुळ'साठी 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' या पॅनलची अधिकृत घोषणा

कोल्हापूर - 'कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ' म्हणजेच 'गोकुळ'साठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढवण्याची घोषणा केली.

या निवडणुकीसाठी 'छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी' या 'पॅनल'ची अधिकृत घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, भाजपचे आमदार अमल महाडिक, 'जनसुराज्य शक्ती पक्षा'चे आमदार विनय कोरे आणि प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.

'जनसुराज्य शक्ती पक्षा'चे आमदार विनय कोरे यांनी मध्यस्थाची भूमिका बजावत सर्व नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होत आहे. भूतकाळातील मतभेद विसरून महायुती म्हणून एकत्रिपणे निवडणुकीला सामोरे जावूया. जुन्या वादांवर चर्चा न करता संघटितपणे लढणे, हेच आपले ध्येय असावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीत जागावाटपाविषयी अंतिम निर्णय झाला नसला, तरी त्यासाठीचे प्राथमिक सूत्र निश्चित करण्यात आले. विविध गटांकडे येणार्‍या ठरावांच्या आधारे जागावाटपाचा विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. महायुतीच्या बैठकीनंतर जागावाटपाविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi