Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोव्यात श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सामाजिक माध्यमांत धर्मांध ख्रिस्त्यांकडून आक्षेपार्ह टिपण्या

गोव्यात श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी सामाजिक माध्यमांत धर्मांध ख्रिस्त्यांकडून आक्षेपार्ह टिपण्या

शिवोली, ३० जुलै (वार्ता.) - भारतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल सामाजिक माध्यमांत अत्यंत आक्षेपार्ह, मानहानीकारक आणि अपमानास्पद टिपण्या करणार्‍यांवर तात्काळ अन् कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्वामी समर्थ मठाने केली आहे.

शिवोली येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनावरण करण्यात आले. 'आमचे गोवा'या फेसबुक पानावर श्री स्वामी समर्थ यांच्या पुतळ्याविषयी एक 'पोस्ट' प्रसिद्ध करण्यात आली होती. या 'पोस्ट'वर अनेक भाविकांनी श्रद्धा व्यक्त केली असतांना काही धर्र्मांध ख्रिस्त्यांनी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह, उपरोधिक आणि अपमानास्पद टिपण्या केल्याचे समोर आले आहे.

या व्यक्तींच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत मिलानी मस्कारेन्हस, पर्पेच्युओ अँथनी डिकॉस्टा, एडविन फर्नांडिस, रिचर्ड रॉड्रीगीज, सिरिल फर्नांडिस, बेनेथ अफोन्सो आणि जोकिम रॉड्रीगीज या व्यक्तींचा उल्लेख केला आहे. या व्यक्तींनी श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे लाखो स्वामीभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व आक्षेपार्ह टिपण्यांचे स्क्रीनशॉट्स (लिखाणाची छायाचित्रे) पुराव्यादाखल पोलिसांकडे सादर करण्यात आली आहेत. कायद्याचे राज्य असलेल्या धर्मनिरपेक्ष समाजात पूजनीय संतांचा असा वारंवार होणारा अपमान सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत समितीने पोलिसांना या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन तात्काळ आणि कठोर पावले उचलण्याची विनंती केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi