वाळपई, २२ ऑगस्ट (वार्ता.) - विविध क्षेत्रांत योगदान देणार्या मान्यवरांचा पाठिंबा 'मराठी राजभाषा आंदोलना'ला मिळवण्याच्या मराठी राजभाषा निर्धार समितीच्या प्रयत्नास उत्तम प्रतिसाद मिळायला प्रारंभ झाला आहे.
फोंडा येथील कार्यक्रमात गोव्यातील ३२२ लेखक आणि साहित्यिक यांच्या पाठिंब्याचे निवेदन देण्यापाठोपाठ आता १३७ कीर्तनकारांच्या मराठी राजभाषा पाठिंब्याचे निवेदन २१ ऑगस्टला वाळपई, सत्तरी येथील एका कार्यक्रमात मराठी राजभाषा निर्धार समितीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले.
प्रातिनिधिक स्वरूपात ह.भ.प.विवेकबुवा जोशी, ह.भ.प. (सौ.) वंदना जोशी, ह.भ.प. गुरुदासबुवा सुतार आणि ह.भ.प. संदीप केळकर यांनी हे कीर्तनकारांच्या पाठिंब्याचे पत्रक राष्ट्रपती आणि गोव्याचे मुख्यमंत्री यांना देण्यासाठी स्वाधीन केले. या वेळी डॉ. अशोक आमशेकर, गोवा विधानसभेचे माजी उपसभापती नरहरि हळदणकर, ज्येष्ठ व्यापारी आणि समाजिक कार्यकर्ते सदानंद काणेकर, तसेच सत्तरी प्रखंड (विभाग) प्रमुख विजय नाईक उपस्थित होते.
गोव्यात भजनी परंपरा आणि कीर्तन, प्रवचन परंपरेला पुष्कळ मोठा समृद्ध वारसा आहे. आजही वर्षभर अनेक धार्मिक सोहळे, मंदिरांचे वर्धापनदिन, जीर्णोद्धार, सर्व लहान-मोठे सण, उत्सव, काले, जत्रोत्सव अशा प्रसंगी मठ-मंदिरांमधून भजन, कीर्तन, प्रवचन, अभंगगायन, हे आद्य मानाने होत असते. चैत्रमास, रामनवमी, हनुमान जयंती, एकादशी, वारी, दिंडी, श्रावणमास, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, त्रिपुरारि पौर्णिमा उत्सव, कार्तिक मास, दत्तजयंती, मार्गशीर्ष महिना, गणेश जयंती, माघी उत्सव, महाशिवरात्री, अधिक मास असे यच्चयावत सण आणि धार्मिक उत्सव यांमधून गोवाभरच्या मंदिरांमधून नामसंकीर्तन, तसेच नामवंत अन् नवोदित कीर्तनकारांची सुरस, प्रबोधनात्मक कीर्तने अखंडपणे चालू असतात. 'संस्कृतच्या पुरस्कारांचा निधी वाढवला, तर अन्य पुरस्कारांसाठीही निधी वाढवावा लागेल', या कारणास्तव पुरस्काराच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली नसल्याचे अर्थ विभागातील अधिकार्यांनी अनौपचारिकरित्या सांगितले. असे असेल, तर राजभाषा मराठीच्या खालोखाल उर्दू भाषेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी का ? आणि अर्थ खात्याने लाल शेरा मारूनही 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'सारख्या योजनांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असेल, तर संस्कृतसाठी थोडाफार निधी द्यायला सरकार आखडता हात का घेत आहे ?, असे प्रश्न निर्माण होत आहेत.

