Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !

हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने आगामी काळ आणि संघटितपणे वेगाने करावयाचे प्रयत्न !

हिंदु राष्ट्र हे संपूर्ण मानवजातीसाठी आहे. सृष्टीतील प्रत्येक जिवाला संरक्षणासाठी देवाने शस्त्र म्हणजे दात, नखे, पंजा किंवा विष दिलेले आहे. स्वरक्षण करणे, हा निसर्गाचा नियम आहे. यानुसार आपण स्वत:चे रक्षण करण्यास स्वतंत्र आहोत.

ईश्वरी व्यवस्थेच्या सनातन धर्मानुसार 'हिंदु धर्माचे रक्षण, म्हणजे संपूर्ण प्राणीजगताचे रक्षण' म्हणजेच मानवधर्माचेच रक्षण आहे. या पृथ्वीवर काहीही नव्हते, तेव्हाही हिंदु धर्म किंवा वेद धर्म अस्तित्वात होता.

ऋषिमुनींनी कलियुगाची गणना ४ लाख ३२ सहस्र वर्षांची केली आहे. त्याच्या दुप्पट काळ द्वापरयुग, तिप्पट काळ त्रेतायुग आणि चौपट काळ सत्ययुगाचा आहे; परंतु ज्या हिशेबाने हे सर्व जण (अमेरिका-इराण, रशिया-युक्रेन युद्ध) जग चालवू इच्छित आहेत, ते पहाता आताचा काळ या जगातील मानवतेचा शेवटचा दिवस असेल. हे थांबवण्यासाठी हिंदूंना संघटितपणे मानवतेचे रक्षण करावे लागेल. त्याला विलंब केल्यास ईश्वरदत्त कार्यावर अन्याय होईल. त्यामुळे हिंदु धर्म रक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे.

'पाटलीपुत्र (पटणा), बिहारचे आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र हे विश्व ज्योतिष महासंघ, एशिया चॅप्टरचे सभापती आहेत. त्यांनी देश-विदेशात प्रवास करून ज्योतिषशास्त्राविषयी जागृती केली. त्यांनी 'राहू का रहस्य', 'केतू का कौतुक', 'सुगम ज्योतिष भास्कर', 'दिव्य समृद्धी तथा वस्तूएं', 'दुर्लभ तोटके' इत्यादी हिंदी भाषेतील पुस्तके लिहिली आहेत. त्यांना 'ज्योतिष सम्राट', 'ज्योतिष शिरोमणी', 'ज्योतिष ऋषि', 'ज्योतिष विभूषण', 'ज्योतिष रत्न' आणि 'ज्योतिष गौरव' अशा विविध २१ पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

ज्योतिषशास्त्र संकेत देते. आपण केवळ ढग पाहून पावसाची शक्यता असल्याचे अनुमान काढले किंवा ढग दिसत नसतांनाही पावसाची शक्यता सांगू लागलो, तर ते योग्य ठरत नाही. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतांचा वापर करून त्या अनुरूप सांगितल्यासच ते ज्योतिषशास्त्र प्रमाणित सिद्ध होते; कारण ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे.

कोणताही घटनाक्रम हे ग्रह किंवा राशी यांचे चक्र आहे. आता 'मेदिनी ज्योतिषशास्त्रा'नुसार जगात प्लुटोचा (यमाचा) सर्वाधिक प्रभाव आहे; कारण २३८ वर्षांत तो स्वतःचे एक राशीचक्र पूर्ण करतो. त्यानंतर शनि अडीच वर्षे एका राशीत रहातो. त्याला राशीचक्र चालायला ३० वर्षे लागतात. गुरु ग्रह (बृहस्पती) एक वर्षात एक रास पालटतो. त्याला राशीचक्र पूर्ण करायला १२ वर्षे लागतात.

ज्योतिषशास्त्र हे निरीक्षणाचे आणि कोणतीही घटना पहातांना अवलोकन करण्याचे शास्त्र आहे. ज्योतिषशास्त्राच्या संकेतानुसार 'संपूर्ण जगाची कर्म व्यवस्थाच पालटणार आहे', असे वाटते. ३ ग्रहांचे (प्लुटो (यम), शनि आणि गुरु ग्रह) एका वर्षात राशीमध्ये परिवर्तन होणे, ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. वर्ष २०२६ मध्ये गुरु ग्रह त्याच्या उच्च अशा कर्क राशीत जाणार. या वर्षाच्या उत्तरार्धापर्यंत तो तेथे रहाणार अन् ३१ ऑक्टोबर २०२६ या दिवशी तो सिंह राशीत जाणार. जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत आणि कर्क राशीत येतो, तेव्हा धर्मनिष्ठ व्यक्तींना शक्ती प्राप्त होते. त्यामुळे मोठमोठी धर्मकार्ये पूर्ण होतात.

वर्ष २०१९ मध्ये श्रीरामजन्मभूमीचा निवाडा लागला. त्यापूर्वी 'एवढ्या वेगाने हा निवाडा होईल', असे कुणीही सांगू शकले नसते. बहुतेकदा निर्णय टाळण्याचा प्रयत्न होत होता. अंतिम सुनावणी दृष्टीपथात नव्हती. सर्व अनिश्चितता होती; परंतु जसा धनु राशीत गुरु आणि शनि यांचा संयोग झाला, तशी संपूर्ण न्यायव्यवस्था श्रीराममंदिराच्या बाजूने झाली आणि ५०० वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष संपून हिंदु समाजाच्या बाजूने निवाडा लागला.

लवकरच गुरु ग्रह मीन राशीत येणार आहे. गुरु ग्रह वैदिक धर्मकारक ग्रह समजला जातो. जगातील चीन आणि रशिया हे साम्यवादी देश आहेत. वर्ष २०२७ पर्यंत त्यांच्या सत्तेत पालट होण्याचे संकेत ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळतात. वर्ष २०२७ पर्यंतचा कालावधी आपल्यासाठी अनुकूल काळ आहे. शनि पुनः राशी परिवर्तन करून मेष राशीत आणि पुढे मंगळाच्या राशीत जाणार. त्यानंतर आपलाही संघर्षाचा काळ आरंभ होईल. त्यामुळे येणार्‍या २-३ वर्षांत हिंदु समाजाला पुष्कळ वेगाने पायाभूत आधारशिलेची निर्मिती करायची आहे. 'त्या आधारशिलेवर हिंदु राष्ट्राचे हे कार्य गुरु ग्रहाच्या चक्रात पूर्ण होईल', असे मला वाटते. गुरु ग्रह मीन राशीत जाता जाता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य घटनात्मक रूपाने यशस्वी होणार आहे.

'कर्म केल्याविना भाग्य लंगडे असते आणि भाग्याविना कर्म अंध असते', हे ज्योतिषशास्त्र शिकवते. त्यामुळे आपल्याला हिंदु राष्ट्राच्या दिशेने तत्परतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे. मला मिळणार्‍या संकेतानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य निकटच्या भविष्यकाळात पूर्ण होणे शक्य होणार आहे; परंतु ग्रह अनुकूल झाल्यावर आनंददायी वातावरण होईल. त्यात आपण हरवून जाता कामा नये. त्या वेळी शिथिलता दाखवली, तर हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य मागे पडू शकते. त्यामुळे संघटित होऊन पुष्कळ वेगाने कार्य करण्याची आवश्यकता आहे.'

- आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती, एशिया चॅप्टर, विश्व ज्योतिष महासंघ, पाटलीपुत्र, बिहार.(४.५.२०२६)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi