पिंपरी (पुणे) - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील उच्चभ्रू इमारतीतील विजय चव्हाण या तरुण सुरक्षारक्षकाने ९ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी सुरक्षारक्षकास अटक केली आहे.
इमारतीच्या आवारात २ लहान मुली खेळत असतांना चव्हाण याने त्यांना गोड बोलून जवळ बोलावले आणि एकीसमवेत वरील प्रकार केला. मुलीने तिथून पळ काढला. घरी आल्यानंतर पालकांना याविषयी सांगितल्यावर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

