नवी देहली - आगामी हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाची नवी 'जर्सी' (गणवेश) प्रदर्शित केली आहे. पूर्वीच्या निळ्या रंगाऐवजी तिचा रंग 'भगवा' केल्यामुळे हॉकी संघाचे माजी कर्णधार विरेन रसकिन्हा यांनी अप्रसन्नता व्यक्त केलत 'हॉकी इंडिया'च्या निर्णयाला 'लाजीरवाणे' म्हटले आहे.
I must say that @TheHockeyIndia has done many good things for 🇮🇳 🏑. But this is embarrassing. The legacy & identity of the Indian team has always been BLUE. I wore the Blue jersey with pride for many years. Fans want to see our Indian team in blue. What is the logic of orange? https://t.co/apDnJkTld4
- Viren Rasquinha (@virenrasquinha)
रसकिन्हा यांनी म्हटले की, भारतीय संघाचा वारसा आणि मूळ ओळख ही नेहमीच निळा रंग राहिली आहे. मी स्वतः अनेक वर्षे अत्यंत अभिमानाने निळ्या रंगाची जर्सी परिधान केली. देशभरातील चाहत्यांनाही भारतीय संघाला निळ्या रंगातच पाहायचे असते. मग जर्सीचा रंग अचानक भगवा करण्यामागे नेमका काय तर्क आहे ?
Saffron Jersey Sparks Political Row
The Indian hockey team's jersey has been changed from blue to saffron for the upcoming Hockey World Cup.
Hockey India has stated that the decision was made to improve visibility on blue synthetic turf and that saffron symbolises courage,… pic.twitter.com/ukgyYYFAXJ
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
'हॉकी इंडिया'ने या जर्सीचे अनावरण करतांना म्हटले आहे की, भगवा रंग हा धैर्य, त्याग आणि विजय यांचा प्रतीक आहे. भारतीय तिरंगा आणि उगवत्या सूर्यापासून प्रेरणा घेऊन ही संकल्पना सिद्ध करण्यात आली असून ती नव्या प्रारंभाचे प्रतीक आहे.
Presenting the new India jersey! 🇮🇳
Every stitch tells a story. Every pattern, every colour carries India's pride.
Our teams are ready to once again do the country proud at the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026.
🎥: Select 2 (SD+HD)+ Khel & JioHotstar
🗓️: August… pic.twitter.com/8GvwbByapq
- Hockey India (@TheHockeyIndia)
'हॉकी इंडिया'चे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी या निर्णयाचे कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हा पालट कोणत्याही एका व्यक्तीचा निर्णय नाही, तर खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक आणि साहाय्यक यांच्या सूचनेनुसार करण्यात आला आहे. निळी जर्सी आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये वापरल्या जाणार्या निळ्या 'सिंथेटिक टर्फ'मध्ये (मानवनिर्मित खेळपट्टीमध्ये) बर्याच अंशी मिसळून जात होती, असे दिसून आले. यामुळे खेळाडूंना मैदानात एकमेकांना ओळखण्यात आणि दिसण्यात अडचण येत होती. प्रशिक्षक आणि खेळाडूंनी या समस्येच्या निवारणासाठी पिवळ्या आणि भगव्या रंगाची सूचना दिली होती. सर्व पैलूंचा विचार केल्यानंतर भगव्या रंगाची निवड करण्यात आली. तांत्रिक आवश्यकता पूर्ण करण्यासोबतच भगवा हा आपल्या राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांपैकी एक आहे, जो शौर्य, त्याग आणि राष्ट्रीय अभिमान यांचे प्रतीक आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वाड्रा यांनी टीका करतांना म्हटले की, त्यांनी जर्सीचा रंग पालटावा किंवा शिक्षण धोरणाच्या माध्यमातून इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करावा, त्यांनी काहीही केले तरीही आपल्या देशातील तरुण काय विचार करतात हे तुम्ही पाहिले आहे. जंतरमंतरवर जमलेल्या तरुणांचे म्हणणे तुम्ही ऐकले आहे. हाच या देशाचा आवाज आहे.

