Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
India Slams Pakistan : पाकिस्तानने आतंकवादी पायाभूत सुविधा नष्ट कराव्यात !

India Slams Pakistan : पाकिस्तानने आतंकवादी पायाभूत सुविधा नष्ट कराव्यात !

वॉशिंग्टन (अमेरिका) - सिंधु जल वाटप करार सदिच्छा आणि मैत्री यांच्या भावनेने करण्यात आला होता; परंतु पाकिस्तानने अर्ध्या शतकापर्यंत ही सदिच्छा आणि मैत्री संपवण्याचेच काम केले. पाकिस्तानच्या वर्तनाने आधीच हा करार रहित झाला होता.

हा करार रहित करून भारताने एकप्रकारे ही वास्तविकता स्वीकारली आहे. जर पाकिस्तानला खरोखरच भारतासमवेतच्या द्विपक्षीय सूत्रांवर सहकार्य हवे असेल, तर त्याने सर्वांत आधी वर्षानुवर्षे उभारलेली आतंकवादी पायाभूत रचना नष्ट केली पाहिजे, अशा शब्दांत अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी पाकला सुनावले. 'न्यूजवीक' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात त्यांनी पाकला सुनावले आहे.

🇮🇳 India slams Pakistan over the Indus Waters Treaty!

Pakistan must dismantle its terror infrastructure and end its support for cross-border terrorism.

Pakistan will not come to its senses until water scarcity creates chaos in the country and its people begin holding the… pic.twitter.com/dzZt0hKVK8

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

क्वात्रा यांनी लेखात म्हटले की, वर्ष १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सिंधु जल वाटप कराराच्या अंतर्गत भारताला सिंधु खोर्‍यातील ६ नद्यांपैकी ३ नद्यांवर नियंत्रण मिळाले. यामध्ये एकूण पाण्याच्या सुमारे २० टक्के पाणी वहाते. पाकिस्तानला अशा नद्यांवर अधिकार मिळाला, ज्यातून सुमारे ८० टक्के पाणी वहाते. या असंतुलनामुळे भारताच्या अनेक भागांचा विकास दीर्घकाळ प्रभावित झाला. तरीही भारताने या कराराचा आदर केला. याच्या बदल्यात पाकिस्तानने वर्ष १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये भारताविरुद्ध युद्धे पुकारली. यासह त्याने सीमापार आतंकवाद चालू ठेवला, ज्यामध्ये वर्ष २००१ चे संसदेवरील आक्रमण, वर्ष २००८ चे मुंबईवरील आतंकवादी आक्रमण, वर्ष २०१६ चा उरी आणि पठाणकोट येथील आक्रमणे, वर्ष २०१९ चे पुलवामा आक्रमण आणि २०२५ चे पहलगाम आक्रमण यांचा समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi