Dailyhunt
इराणमध्ये २१ जणांना फाशी, तर ४ सहस्रांहून अधिक विरोधकांना अटक !

इराणमध्ये २१ जणांना फाशी, तर ४ सहस्रांहून अधिक विरोधकांना अटक !

तेहरान (इराण) - संयुक्त राष्ट्रांनी इराणसंदर्भात एका अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार इराणने आतापर्यंत २१ व्यक्तींना फाशीची शिक्षा दिली असून ४ सहस्रांहून अधिक लोकांना अटक केली आहे.

इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष, तसेच देशांतर्गत चालू असलेली आंदोलने पहाता हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. फाशीची शिक्षा देण्यात आलेल्यांमध्ये आंदोलक, विरोधी संघटनांचे सदस्य आणि हेरगिरीचा आरोप असलेल्या व्यक्ती यांचा समावेश आहे.

🚨 Iran Under Fire: Executions Rise, Thousands Detained

Iran has executed at least 21 people and arrested over 4,000 individuals since the conflict with the US and Israel escalated, according to the United Nations.

The regime is accused of intensifying internal repression;… pic.twitter.com/NiWquuSPOJ

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात इराणमधील कारागृहांमध्ये बंदीवानांशी केल्या जाणार्‍या अमानुष वर्तनाविषयीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बंदीवानांकडून कबुलीजबाब मिळवण्यासाठी बळाचा वापर करणे, यांसारखे आरोप समोर आले आहेत.

संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख व्होल्कर तुर्क यांनी या घडामोडींवर तीव्र आक्षेप नोंदवला. त्यांनी इराण सरकारला फाशीची शिक्षा देण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवण्याचे आणि विनाकारण अटकेत असलेल्या व्यक्तींची सुटका करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi