Friday, 30 Oct, 12.31 am सनातन प्रभात मराठी

होम पेज
इस्लामी देशांकडून विरोध होत असतांना भारताकडून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे समर्थन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन

नवी देहली - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात इस्लामी देशांतून मोहीम राबवण्यात येत आहे. त्यांनी इस्लामी आणि कट्टरतावादी यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा इस्लामी देशांतून विरोध केला जात आहे. यावर भारत सरकारने स्वतःची भूमिका स्पष्ट करत मॅक्रॉन यांचे समर्थन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, मॅक्रॉन यांच्यावर ज्या भाषेमध्ये व्यक्तीगत स्वरूपाची आक्रमणे करण्यात येत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. काही आंतरराष्ट्रीय मानक आहेत, त्याचे हे उल्लंघन आहे. फ्रेंच शिक्षकावर ज्या क्रूर पद्धतीने आतंकवादी आक्रमण करण्यात आले, त्याचाही आम्ही निषेध करतो. संपूर्ण जगाला या घटनेने हादरवून सोडले. फ्रान्सची जनता आणि त्या शिक्षकाच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या या निवेदनानंतर भारतातील फ्रान्सच्या राजदूतांनी भारताचे आभार मानले आहेत. 'आतंकवादाच्या विरोधात दोन्ही देश एकत्र लढा देतील', असे त्यांनी म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi
Top