जेरुसलेम - गाझा पट्टीतील लोकांवर आक्रमण करण्यासाठी इस्रालयने उंदीर आणि घुशी यांना प्रशिक्षण दिले असल्याचा विचित्र आरोप पॅलेस्टिनी नेत्यांनी केला. सध्या गाझामध्ये उदरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
🚨 Bizarre claim resurfaces
Radical Fatah officials allege Israeli forces have deployed "trained rats" in Gaza.
This follows earlier controversial claims:
➡️ 2010: Sharks "trained by Mossad" blamed for attacks in Egypt
➡️ 2015: Dolphins allegedly used for surveillance of Hamas… pic.twitter.com/TlwqlBQiWS
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
गाझामधील फताह पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्व मंडळाचे सदस्य जमाल ओबेद यांनी १८ एप्रिलला फताह पक्षाच्या 'आवदा टीव्ही'वर बोलतांना सांगितले की, अलीकडे गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणात उंदीर आणि घुशी दिसत आहेत. यापूर्वी हे प्राणी या भागात कधीही दिसले नाहीत. इस्रायलने जाणीवपूर्वक हे उंदीर आणि घुशी गाझा पट्टीत सोडल्या आहेत, ही वस्तूस्थिती आहे. 'अवदा टीव्ही'वर १५ एप्रिलला प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत गाझामधील 'पॅलेस्टाईन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन'चे संचालक रफत अल्-कुद्रा म्हणाले की, मोठ्या आकारातील उंदीर आणि घुशी या गाझा पट्टीतील लोकांवर विशेषतः लहान मुलांवर आक्रमण करत असल्याचे समोर आले आहे. हे उंदीर आणि घुशी यांना इस्रायलने प्रशिक्षण दिल्याचे दिसून येत आहे.
इस्रायलने मात्र या आरोपांवर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
इस्रायलने २०१० मध्ये इजिप्तमधील पर्यटकांवर आक्रमण करण्यासाठी मोसाद-प्रशिक्षित शार्क माशांचा आणि वर्ष २०१५ मध्ये हमासमध्ये हेरगिरी करण्यासाठी कॅमेरा-सज्ज डॉल्फिन माशांचा वापर केला होता.

