Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इस्रायलच्या गोळीबारात पॅलेस्टाईनचे २ सुरक्षा अधिकारी ठार

इस्रायलच्या गोळीबारात पॅलेस्टाईनचे २ सुरक्षा अधिकारी ठार

घटनास्थळ

तेल अविव (इस्रायल) - इस्रायलच्या सुरक्षादलाच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पॅलेस्टाईनचे २ सुरक्षा अधिकारी ठार झाले आहेत. इस्रायलच्या नियंत्रणात असलेल्या वेस्ट बँकमधील जेनिन शहरामध्ये झालेल्या झटापटीत हे अधिकारी ठार झाल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. ठार झालेले अधिकारी पॅलेस्टाईन सैन्याच्या गुप्तचर विभागाचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. इस्रायलच्या सैन्याने या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. या घटनेमुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये झालेली शस्त्रसंधी मोडली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi