अयोध्या (उत्तरप्रदेश) - श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सचिवपदासाठी श्रीराममंदिर बांधकाम प्रकल्पाचे मानद व्यवस्थापक जगदीश आफळे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात २ सप्टेंबरला होणार्या न्यासाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
जगदीश आफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. श्रीराममंदिर बांधकाम प्रकल्पाच्या व्यवस्थापनाचे दायित्व सध्या त्यांच्याकडे आहे. भारतासह युरोप आणि अमेरिकेत दीर्घकाळ काम केल्यानंतर ते निवृत्त झाले. श्रीराममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ झाल्यानंतर संघाच्या शिफारशीनुसार त्यांची मानद प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते पत्नीसमवेत अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र परिसरात वास्तव्यास आहेत.

