कोलकाता (बंगाल) - बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांची माहिती गोळा करणार्या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या हामिम मंडल या आतंकवाद्याला पूर्व बर्धमान जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली.
तो काश्मीरमधील पुलवामा येथे वर्ष २०१९ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलावर झालेल्या आक्रमणाचा सूत्रधार सज्जाद भट याचा निकटवर्तीय आहे. या आक्रमणात ४० सैनिकांना वीरमरण आले होते.

