Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खार येथे गॅसचोरी उघड; ४० सिलिंडर हस्तगत !

खार येथे गॅसचोरी उघड; ४० सिलिंडर हस्तगत !

मुंबई - खारमध्ये पोलिसांनी सिलिंडरमधून केली जाणारी गॅसचोरी उघडकीस आणली आहे. एका एजन्सीचा कर्मचारी टेंपोमधील भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरत होता. पोलिसांनी त्याला हटकले आणि टेंपोतील भरलेल्या सिलिंडरचे वजन केले असता त्यामध्ये गॅस न्यून असल्याचे दिसताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून ४० सिलिंडर हस्तगत केले.

गॅस सिलिंडरमध्ये भेसळ केली जात असल्याची माहिती ग्राहक संरक्षण संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी कळवल्यावर पोलिसांनी वरील कारवाई केली. (जे एका संस्थेच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? - संपादक) पोलीस पडताळणी करत असतांना तेथील कर्मचारी काळूराम बेनीवाल याने तेथून पळ काढला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi