Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोलवाळ कारागृहात एका बंदीवानावर दुसर्‍या बंदीवानाचे आक्रमण

कोलवाळ कारागृहात एका बंदीवानावर दुसर्‍या बंदीवानाचे आक्रमण

म्हापसा, २७ मे (वार्ता.)- कोलवाळ येथील कारागृहाच्या आवारात पुन्हा एकदा हिंसक आक्रमण झाल्याच्या वृत्तामुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्था आणि बंदीवानांची सुरक्षा याविषयी गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

एका आठवड्यापेक्षा अल्प कालावधीतील ही दुसरी घटना आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार कोलवाळ कारागृहात देवराज ह्यो या बंदीवानाला सहकारी बंदीवानांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीमुळे देवराज घायाळ झाला. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने तातडीने वैद्यकीय साहाय्याची व्यवस्था केली आणि घायाळ बंदीवानाला पुढील उपचारांसाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात भरती केले. या आधी राकेश पाटील या बंदीवानाला नारायण उपाख्य बाबू भालेकर या बंदीवानाने मारहाण केल्याची घटना घडली होती. राज्य कारागृहात वारंवार होणार्‍या हिंसक घटनांमुळे अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, बंदीवानांवरील देखरेख आणि कारागृहातील एकूण कायदा-सुव्यवस्था यांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या ताज्या घटनेमुळे कारागृहात अधिक कडक देखरेख आणि भक्कम प्रतिबंधात्मक उपाययोजनांची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi