वॉशिंग्टन (अमेरिका) - आम्ही एका अतिशय चांगल्या कराराच्या जवळ पोचलो आहोत. जर आपण खूप घाई केली, तर चांगला करार होऊ शकत नाही. हळूहळू का होईना, आम्हाला जे हवे आहे, ते आम्ही मिळवत आहोत; पण जर आम्हाला जे हवे आहे, ते मिळाले नाही, तर आम्ही हा विषय 'वेगळ्या पद्धतीने' संपवू, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
ते एका मुलाखतीत बोलत होते.
इराणच्या सैन्यदलाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले नाही, याचे कारण स्पष्ट करतांना ट्रम्प म्हणाले की, इराणच्या सैन्यातील काही विभाग थोडे मवाळ विचारसरणीचे आहेत, असे आम्हाला वाटते. एखाद्या देशाची संपूर्ण व्यवस्थाच नष्ट केली, तर त्याचे दीर्घकालीन गंभीर परिणाम होतात. युद्धात संपूर्ण देशालाच संपवून टाकण्याची चूक पूर्वी झाली आहे, ज्यामुळे तो देश ४० वर्षे उभा राहू शकला नाही. इराकचे काय झाले, ते आपण पाहिलेच आहे. आम्ही इराणचे संपूर्ण नौदल संपवले, तरीही माध्यमे सांगतात की, त्यांचे नौदल उत्तम काम करत आहे. आपल्याकडे निष्पक्ष माध्यम नाही, ते केवळ खोटे बोलतात.

