Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विजयी !

काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विजयी !

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच 'गोकुळ'च्या २५ संचालकांच्या जागेसाठीच्या निवडणुकीत सध्याच्या 'सत्ताधारी छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी'चा (महायुती - भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती) पराभव झाला आहे.

महायुतीला १२ जागा मिळाल्या असून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ने १३ जागा जिंकून 'गोकुळ'वर सत्ता मिळवली आहे.

या निवडणुकीत 'गोकुळ'चे अनेक विद्यमान संचालक, माजी अध्यक्ष पराभूत झाले. यात प्रामुख्याने माजी अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावीद मुश्रीफ यांचा प्रमुख पराभव झाला आहे. याच समवेत माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी अन् भाजप प्रदेश उपाध्यक्ष सौ. शौमिका महाडिक यांचा समावेश आहे. नव्या संचालक मंडळात १२ माजी संचालक पुन्हा विजयी झाले असून अधिवक्ता वीरेंद्र मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील यांसह १३ नव्या संचालकांना संधी मिळाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi