रांची (झारखंड) - येथे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग यांनी संयुक्तरित्या ओरमांझी भागात असलेल्या एका दारूच्या कारखान्यावर घातलेल्या धाडीमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते आणि बिहारचे माजी आमदार सुबोध कुमार राय यांच्यासह ३ जणांना अटक केली.
येथून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली. या दारूच्या बाटल्यांवर किंगफिशर, रॉयल्सन गोल्ड व्हिस्की, आफ्टर डार्क ब्लू व्हिस्की आदी नामांकित दारूंचे लेबल लावून ती इतर राज्यांमध्ये विकण्याची सिद्ध केली जात होती.

