Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोहगडावरील मृत्यू घातपातच !

लोहगडावरील मृत्यू घातपातच !

पुणे - काही दिवसांपूर्वी लोहगडावर पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवाल याचा पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती; मात्र पोलिसांच्या अन्वेषणात हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे उघड झाले आहे.

केतनचे लग्न सिया गोयल हिच्याशी ठरले होते; परंतु तिला हे लग्न मान्य नव्हते. पोलिसांनी 'मोबाईल कॉल रेकॉर्ड' आणि 'टॉवर लोकेशन' पडताळले असता १८ जूनला सिया गोयल हिने तिचा मित्र चेतन चौधरी आणि इतर सहकारी यांच्या साहाय्याने केतनला लोहगडावरून ढकलून दिल्याचे समोर आले. अनुमाने आठवडाभरापासून या हत्येचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित सिया गोयल आणि तिच्या ८ मित्रांवर गुन्हा नोंद केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi