Dailyhunt
Love Jihad : बहीण तैसीमने तिचा भाऊ समीर मुल्ला याच्याशी पीडितेची करून दिली होती ओळख !

Love Jihad : बहीण तैसीमने तिचा भाऊ समीर मुल्ला याच्याशी पीडितेची करून दिली होती ओळख !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) - येथे समीर मुल्ला या लव्ह जिहाद्याने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघड झाल्यानंतर व्यायाम प्रशिक्षक (जिम ट्रेनर) असलेल्या समीरला त्याच्या घरात घुसून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जुना हुब्बळ्ळी पोलिसांच्या स्वाधीन केले.

या प्रकरणात अडकलेल्या पीडितेनेही स्वत:चा व्हिडिओ प्रसारित करून तिच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती दिली. तिने म्हटले की, समीरची बहीण तैसीम हिनेच माझ्याशी जवळीक साधली आणि समीरशी माझी ओळख करून दिली होती.

Hubballi (Karnataka): 'Love Jihad' Case

The victim was introduced to Sameer Mulla by his sister, Taseem.

Activists entered Sameer's residence and handed him over to the police.

The incident has sparked concerns and debate among some sections of society regarding interfaith… pic.twitter.com/1yJJj0F1pA

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

समीर हा शहरातील विजयनगर क्षेत्रातील रहिवासी असून त्याची बहीण तैसीम हिच्या माध्यमातून त्याची पीडितेशी ओळख झाली. यानंतर त्याने तिला जाळ्यात ओढले. एकदा तिला घरी बोलावून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. समीरच्या भ्रमणभाषमध्ये हिंदु तरुणींची छायाचित्रे, गर्भनिरोधक गोळ्यांची छायाचित्रे आदी संशयास्पद गोष्टी आढळल्या, असे पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi