(गेमिंग ॲप म्हणजे ऑनलाईन खेळ खेळण्यासाठीचे ॲप)
हरियाणा - 'गेमिंग ॲप'द्वारे हरियाणातील एका ११ वर्षीय हिंदु मुलीला जाळ्यात ओढून तिला ५ दिवस स्वतःच्या घरात डांबून ठेवल्याच्या प्रकरणी जमीर काझी नावाच्या मुसलमान तरुणाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
'आज तक'च्या वृत्तानुसार, जमीर हा आधीच विवाहित असून त्याला एक मुलगाही आहे.
'Love Jihad' through a gaming app
Zameer Qazi, a father of one child, lured an 11-year-old Hindu girl from Haryana into his trap
Such incidents will continue unless strict punishment is enforced.
Take strict action against the accused! - Demand from citizens#Save_Hindu_Girls… pic.twitter.com/b45juMJnlP
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
जमीर काझी याने हिंदु मुलीला जाळ्यात ओढण्यासाठी 'बादशाह' या नावाने एक बनावट ओळखपत्र सिद्ध केले. त्याने मुलीला फूस लावून अकोला येथे आणले आणि ५ दिवस स्वतःच्या घरात डांबून ठेवले. मुलगी बेपत्ता झाल्याचे कळल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी हरियाणा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर मुलीच्या भावाने तिचा शोध घेत ती अकोल्यात असल्याचे सांगितले आणि पोलिसांच्या साहाय्याने तिची सुटका करण्यात यश मिळवले. पोलिसांनी आरोपी जमीर काझी याला कह्यात घेतले आहे. मुलीला सध्या एका शासकीय बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचे 'लव्ह जिहाद' आणि फसवणूक यांसह सर्व संभाव्य अंगांनी अन्वेषण करत आहेत.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक संघटनांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? - संपादक) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याची खरी ओळख लपवण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींना लक्ष्य करण्यासाठी 'गेमिंग ॲप्स'चा वापर करत होता.

