सोलापूर - हिंदु देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६' कायदा रहित करावा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने सोलापूर येथील जिल्हाधिकार्यांच्या वतीने नायब तहसीलदार श्रीमती मते यांना देण्यात आले.
मंदिर महासंघाची मागणी योग्य असून या संदर्भात शासनाकडे भूमिका मांडू, असे आश्वासन श्रीमती मते यांनी या वेळी दिले.
सोलापूर येथे निवेदन देतांना सर्वश्री श्रीक्षेत्र वडवळ नागनाथ देवस्थान मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत शिवपुजे, तसेच विश्वस्त महादेव ननवरे, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पिठासन धर्माधिकारी प्रसाद पंडित, महासिद्ध देवस्थानचे अध्यक्ष संतोष पुजारी, जिल्हा संयोजक राष्ट्रभक्त अधिवक्ता सतीश गाजूल, वैष्णव मारुति देवस्थानचे अध्यक्ष भास्कर राऊळ, वैष्णव मारुति देवस्थानचे विश्वस्त दीपक परदेशी, नारायण दुभाषी, अंबादास देवसानी, उद्योजक सर्वश्री अमृत केजरला, व्यंकटेश बोद्दी, महाराष्ट्र मंदिर महासंघ जिल्हा संघटक विनोद रसाळ, सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक राजन बुणगे, संदीप ढगे, महादेव पाटील, सौ. राजश्री देशमुख, पुरोहित बालराज दोंतुल आदी उपस्थित होते.
अक्कलकोट येथे तहसीलदार श्री.विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी निवेदन देतांना अखिल भारतीय ब्राम्हण संघाचे अध्यक्ष श्री. बाबुराव कुलकर्णी, बॅग्गेहळ्ळी रोडचे माजी सरपंच श्री खर्जुगी सर, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुरोहित श्री. अभिजीत कुलकर्णी, रवि वृद्धाश्रमाचे अध्यक्ष श्री. रवि महिंद्रकर, समता नगर देवी मंडळाच्या सदस्य सौ. नीलिमा खजुर्गिकर,एकमुखी दत्त मंदिरातील सेवेकरी कु. अमृता कोळ्ळे, कु. ऐश्वर्या विभूते, कु अंबिका कलबुर्गी, सौ. मंगल हुच्चे, श्री. अमर कोळ्ळे, श्री. राजेंद्र हुच्चे उपस्थित होते, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुखदा ग्रामोपाध्ये, सनातन संस्थेच्या कु. मनिषा करंदीकर हे उपस्थित होते.
तुळजापूर येथे तहसीलदार श्री. अरविंद बोळंगे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी निवेदन देतांना सिद्धगरीब नाथ मठाचे मठाधिपती योगी महंत मावजीनाथ महाराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अमित कदम, श्री. सर्वोत्तम जेवळीकर उपस्थित होते.
माढ्याचे तहसीलदार श्री. संजय भोसले यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी मंदिर महासंघाचे तालुका संयोजक श्री. शांतीलाल झाडे, श्री. रोकडोबा मारुती मंदिर विश्वस्त श्री. प्रमोद रोटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. महादेव लटके, श्री. शंकर जाधव, श्री. मनीष लटके, श्री. अमोल कासार, श्री. सोमनाथ पाटील, श्री. शुभम रघुनाथ तंडे, श्री. गौतम शिंदे हे उपस्थित होते.
बार्शी येथे तहसीलदार श्री. शेख यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. पार्श्वपुरम ट्रस्टचे, श्री जैन श्वेतांबर मंदिर, कुर्डूवाडी रोड, बार्शी यांचे अध्यक्ष श्री.कपूरबा, श्री पार्श्वपुरम, जैन मंदिर, सोमवार पेठ, बार्शी यांचे विश्वस्त श्री. प्रदीप बाधमार, मंदिर महासंघाचे श्री. तानाजी गोरे, श्रीमती दमयंती रोडे, सौ. मंदाकिनी पवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री.स्वप्निल भुईभार, श्री. महेश गायकवाड, सौ. सीमा व्हनकलस, सौ. संध्या जावळे, सौ. सुनीता व्हनकळस, सौ. शैला सवाईराम उपस्थित होते.
भूम (जिल्हा धाराशिव) येथे नायब तहसीलदार श्री. प्रविण जाधव आणि उपविभागीय अधिकारी श्री. संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विघ्नहर्ता गणेश मंदिरचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण काळे, श्री. सचिन बारगजे, श्री. दीपक बारबोले, ब्राह्मण संघटना तालुकाध्यक्ष श्री. सुधीर देशमुख, श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष श्री. आनंद बेलसरे, श्रीराम मंदिराचे विश्वस्त श्री. प्रविण बुरटे, श्री. मनीष राजोपाध्ये हे उपस्थित होते.
१) श्री वैष्णव मारुती देवस्थान, सोलापूर
२) श्री जागृत दक्षिणमुखी मारुती समाजसेवी न्याय, सैफुल, सोलापूर
३) श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, साखरपेठ, सोलापूर.
४) श्री महासिध्द देवस्थान ट्रस्ट, सोलापूर.
५) राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती यांच्या वतीने जिल्हा संयोजक राष्ट्रभक्त अधिवक्ता सतीश गाजूल यांच्या वतीने देण्यात आले.

