Dailyhunt
महाराष्ट्रात 'शून्य सावली'ला प्रारंभ

महाराष्ट्रात 'शून्य सावली'ला प्रारंभ

नागपूर - राज्यात ३ मेपासून 'शून्य सावली' दिवसांचा अनुभव घेता येणार असून ३१ मेपर्यंत विविध शहरांमध्ये काही क्षणांसाठी वस्तूंची सावली नाहीशी होणार आहे. सूर्य बरोबर डोक्यावर (९० अंश कोनात) येतो, तेव्हा कोणत्याही उभ्या वस्तूची सावली पायांखाली येते किंवा अदृश्य होते.

पृथ्वीचा अक्ष कललेला असल्यामुळे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांमध्ये ही घटना वर्षातून दोनदा घडते.

३ मेपासून ही घटना सावंतवाडी येथे प्रारंभ होणार आहे. त्यानंतर १३ मे या दिवशी पुणे परिसर, १५ मे या दिवशी मुंबई आणि नवी मुंबई, २६ मे या दिवशी नागपूर आणि भंडारा, ३१ मे या दिवशी तोरणमाळ, धुळे येथे शेवट होईल. दुपारी १२ ते १२.३५ पर्यंत हे अनुभवता येईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi