Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मालमत्ताकर वसुलीच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता !

मालमत्ताकर वसुलीच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता !

नवी मुंबई, २९ मे (वार्ता.) - नवी मुंबई महानगरपालिका टी.टी.सी. एम्.आय.डी.सी. क्षेत्रातील मालमत्ताकर वसुलीसाठी सक्षम प्राधिकरण असल्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला या क्षेत्रातील मालमत्ताकर वसुलीचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.

टी.टी.सी. एम्.आय.डी.सी. क्षेत्र हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येत नाही. त्यामुळे नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रासाठी महानगरपालिका कर आकारू शकत नाही. या प्रकरणी वर्ष २०१० मध्ये सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

या प्रकरणावर सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, कर आणि शुल्क या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे दोन वेळा कर आकारला जात नाही, हेही स्पष्ट झाले आहे. हे संपूर्ण क्षेत्र महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कराद्वारे जमा महसुलातून शहर विकासाची कामे केली आहेत. या माध्यमातून महानगरपालिकेस मिळणारा महसूल शहर विकासाला नवी गती देणारा असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi