मालेगाव (नाशिक) - बकरी ईदच्या नावाखाली गोवंशियांची हत्या होऊ नये, यासाठी येथील पोलिसांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही केली. घर, यंत्रमाग कारखाने, गल्लीबोळ आणि झाडेझुडपे यांच्यात लपवून ठेवलेल्या गोवंशियांना सोडवण्यात आले.
महागड्या वाहनांत निर्दयीपणे कोंबून केलेली चोरटी वाहतूक उघडकीस आणत पोलिसांनी ९०६ गोवंशियांची हत्या रोखली.
पोलिसांनी मालेगाव विभागांतर्गत एकूण १५५ धडक कारवाया केल्या. यात २५७ गोतस्करांविरोधात सुधारित गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांनी 'गो स्कॉड' (विशेष पथक) तैनात करून नाकाबंदी केली होती. या कारवाईत एकूण ९०६ गोवंशियांची सुटका करून ११० वाहने जप्त करण्यात आली.

