Dailyhunt
मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी पराभूत !

मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी पराभूत !

बीड - केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव झाला असून ग्रामपंचायत सदस्य स्वरूपानंद देशमुख विजयी झाले.

या निवडणुकीत २ सहस्र ८० मतदारांपैकी १ सहस्र ७४४ जणांनी मतदान केले, म्हणजे सुमारे ८४ टक्के मतदान झाले. देशमुख कुटुंबियांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती; मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी अर्ज कायम ठेवल्याने मतदान घ्यावे लागले. मतदानाच्या दिवशी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. डिसेंबर २०२४ मध्ये तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi