नवी देहली - भगवान श्रीकृष्णांना ५ वेळा नमाजपठण करणारे म्हणणार्या उत्तरप्रदेशाच्या (मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक) मौलाना जर्जिस अन्सारी याने आता भगवान शिवाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
एका जाहीर सभेला संबोधित करतांना मौलाना जर्जिस याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात तो म्हणतो की, शंकरजींची सुंता झाली होती. ब्रह्माजींनी (ब्रह्मदेवाने) शंकरजींची सुंता केली. जर ब्रह्माजींनी शंकराची सुंता केली नाही, तर शिवलिंगाची पूजा कशी होते ? शंकरजींचे लिंग शंकरजींसमवेत होते, मग शंकरजींच्या लिंगाची वेगळी पूजा का करता ? शिव-लिंग !
"If Brahma circumcised Lord Shiva, then how do you worship the Shivling?"
Maulana Jarjis Ansari Makes Objectionable Remarks About Lord Shiva After Earlier Comments on Lord Krishna
Hindu organisations protested in multiple cities demanding legal action.
If similar remarks had… https://t.co/xdCsUHArifpic.twitter.com/FMTU08G2Ab
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
मौलानाने पुढे म्हटले की,
ब्रह्माजींनी शंकराला निर्माण केले. शंकरजी मोठे झाल्यावर त्यांनी ब्रह्माजींना लिंग मोजण्याच्या कामावर लावले आणि जेव्हा त्यांनी मोजणे प्रारंभ केले, तेव्हा ५० सहस्र वर्षांपर्यंत ते मोजतच राहिले. ते संपता संपतच नव्हते. ब्रह्माजींना राग आला. ५० सहस्र वर्षांपर्यंत जे मोजले गेले, ते तिथेच राहिले आणि ५० सहस्र वर्षांनंतर जे उरले, ते ब्रह्माजींनी त्यांच्या दातांनी कापून थुंकले. जे थुंकले, ते पंडितावर जाऊन पडले. पंडिताने ते पाहून म्हटले, 'ओ जय ! ओम नमः शिवाय !' त्या दिवसापासून शंकरजींच्या लिंगाची पूजा होत आहे.
भोपाळमधील 'श्री हिंदू उत्सव समिती' आणि 'संस्कृती बचाओ मंच'चे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी यांनी चेतावणी देत म्हटले की, जर मौलाना जर्जिस भोपाळमध्ये आले, तर आम्ही त्यांचे तोंड काळे करून, गाढवावर बसवून आणि १०० बुटांचा हार घालून विरोध प्रदर्शन करू. हिंदु समाज आराध्य देवतांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
इंदूरमध्येही हिंदु संघटनांचा संताप पहायला मिळाला. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि कावड यात्रेकरू चंदन नगर पोलीस ठाण्यात पोचले अन् मौलानावर गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केले.
लक्ष्मणपुरीच्या हजरतगंज चौकात 'भारतीय गौ सेवक परिषद' आणि 'भारतीय किसान मंच' यांनी मौलाना जर्जिसचा पुतळा जाळला. त्याआधी लोकांनी पुतळ्याला जोडे-चप्पल मारले. भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र कुमार तिवारी यांनी सांगितले की, मौलानाला अटक झालीच पाहिजे.
योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री कपिल देव अग्रवाल म्हणाले की, काही लोकांची बुद्धी भ्रष्ट होते, ते नेहमी निरर्थक गोष्टी बोलतात. या लोकांच्या दायित्वशून्य वक्तव्यांमुळे वातावरण बिघडते. अशा लोकांना मुसलमान समाजातील उत्तरदायी लोकांनीच चोख प्रत्युत्तर देणे योग्य राहील.
इस्लामी विचारवंत मुफ्ती शमशुद्दीन नदवी म्हणाले की, इस्लाम दुसर्या कोणत्याही धर्माची किंवा त्यांच्या पैगंबरांची टीका करण्याची अनुमती देत नाही, सर्वांचा आदर करायला शिकवतो. जर्जिसचे वक्तव्य अत्यंत घाणेरडे आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
मौलाना जर्जिस याच्या वक्तव्यावर ज्येष्ठ पत्रकार हैदर काझी म्हणाले की, गायीला योगी आदित्यनाथ यांची आई सांगणार्या बिहारच्या मौलानाला तात्काळ अटक होते, मारून मारून त्याचे पाय तोडले जातात; पण जर्जिसने भगवान श्रीकृष्ण आणि शिव यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करूनही जर त्याला अटक होत नसेल, तर समजले पाहिजे की, हे वक्तव्य त्याने स्वतः केलेले नाही, तर त्याच्याकडून करवून घेतले जात आहे.

