नवी देहली - जोपर्यंत देशात इस्लामी कायदा लागू होत नाही, तोपर्यंत बलात्कार, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या समस्या संपवणे कठीण आहे, असा दावा 'ऑल इंडिया इमाम असोसिएशन'चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी केला.
काही इस्लामी देशांचे उदाहरण देत तेथे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार अल्प असल्याचा दावाही त्यांनी केला.
If Indian laws are enforced impartially, strictly and swiftly, every such problem can be tackled.
Maulana Khalid Rashid Firangi Mahali responded that India will be governed only according to the Constitution & that existing laws are sufficient to curb crime.
PC: @ZeeNewsEnglishpic.twitter.com/FcacqRWTUO
- Sanatan Prabhat (Kannada) (@Sanatan_Prabhat)
'भारतात असा कायदा लागू केला जात नाही; कारण लोकांच्या मनात शरीयत कायदा लागू होईल, अशी भीती आहे', असेही साजिद रशिदी यांनी म्हटले.
'इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया'चे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी मौलाना रशिदी यांच्या विधानावर म्हटले की,
१. भारताचा कारभार राज्यघटनेनुसार चालतो. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माशी आणि 'पर्सनल लॉ'शी (वैयक्तिक कायद्यांशी) संबंधित श्रद्धा पाळण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु हे सर्व राज्यघटनेच्या कक्षेतच असले पाहिजे.
२. सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे की, 'पर्सनल लॉ'च्या स्वतःच्या मर्यादा आहेत आणि ते घटनात्मक चौकटीच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. देशात गुन्हे रोखण्यासाठी आधीपासूनच पुरेसे कायदे अस्तित्वात आहेत.
३. धार्मिक नेत्यांनी समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्याच्या दिशेने कार्य करण्याची आवश्यकता आहे. लोकांचे योग्य शिक्षण आणि संगोपन आवश्यक आहे. जोपर्यंत समाजात या दिशेने पुरेसे प्रयत्न होणार नाहीत, तोपर्यंत गुन्हेगारीच्या घटनांवर पूर्णपणे आळा घालणे हे एक आव्हानच राहील.

