Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
(म्हणे) 'कुंकू इस्लामी देशांमधून येते, तर मग हिंदू टिळा लावणे बंद करतील का ?' - Priyank Kharge

(म्हणे) 'कुंकू इस्लामी देशांमधून येते, तर मग हिंदू टिळा लावणे बंद करतील का ?' - Priyank Kharge

बेंगळुरू (कर्नाटक) - 'कुंकू केशरापासून बनवले जाते. (या अभिनव शोधासाठी काँग्रेसच्या गृहमंत्र्यांना पारितोषिक द्यायला हवे ! - संपादक) ९० टक्के कुंकू इस्लामी देशांमधून येते. असे म्हटल्यावर उद्या हिंदू टिळा लावणे बंद करतील का ?', असा प्रश्न कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी उपस्थित केला.

या लोकांना (संघ आणि भाजप यांना) त्यांच्याकडे (इस्लामी देशांकडे) पहायलाही आवडत नाही, असे म्हणत प्रियांक खर्गे यांनी भाजप आणि रा.स्व. संघ यांच्यावर टीका केली. येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी कुंकवाविषयी भाष्य केले.

🚨 Congress Minister Under Fire for Bizarre Claim! 🚨

​Karnataka Home Minister Priyank Kharge has sparked intense criticism after claiming that Kumkum is made from saffron (kesar) imported from Islamic countries, questioning if Hindus would stop wearing it. 🧐❌

​Here are the… pic.twitter.com/MfsAO4PP5S

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

१. प्रियांक खर्गे यांचा हा व्हिडिओ प्रसारित होताच त्यावर टीका होऊ लागली आहे. मुळात कुंकू केशरापासून बनत नाही. हळद आणि चुनखडी यांसारख्या देशी वस्तूंचा वापर करून कुंकू बनवले जाते; परंतु गृहमंत्र्यांना हेही ठाऊक नाही, असे म्हणत अनेकांनी सामाजिक माध्यमावर त्यांना लक्ष्य केले आहे.

२. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनीही या व्हिडिओवरून प्रियांक खर्गे यांच्यावर टीका केली आहे. खर्गे यांना कुंकू कसे बनते, हेही ठाऊक नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi