Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
(म्हणे) 'रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !' : AIMIM Chief Owaisi

(म्हणे) 'रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !' : AIMIM Chief Owaisi

वी देहली - जर रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे मानले जात असेल, तर राज्यघटनेच्या कलम २५ नुसार सर्व धर्मांच्या धार्मिक कार्यांवर समान रीतीने म्हणजे रस्त्यावर सण साजरे करणे यांवरही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन - अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) प्रमुख असणारे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली.

ते उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रस्त्यावरील नमाजपठणाच्या विरोधातील विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते. कलम २५ धर्मस्वातंत्र्याची आणि स्वतःच्या धर्माचे पालन अन् प्रसार करण्याच्या अधिकाराची हमी देते.

'If offering Namaz on the streets is wrong, then ban the celebration of all festivals!' : AIMIM chief Asaduddin Owaisi

​By stating 'We cannot live together with Hindus,' and after the killing of millions of Hindus and the rape of Hindu women, Muslims were given a partitioned… pic.twitter.com/ETwzjJOi8Z

- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)

१. नमाजपठणावर लोकांचा आक्षेप दुटप्पीपणा दर्शवतो. इतर समुदायांच्या धार्मिक मिरवणुका आणि सभा यांविषयी अशा प्रकारची चिंता का व्यक्त केली जात नाही ? (हिंदूंचे प्रत्येक धार्मिक कार्यक्रम रीतसर अनुमती घेऊन केले जातात, तर मुसलमान कायदाद्रोह करत असतात, हे जगजाहीर आहे ! - संपादक)

२. रस्त्यावर नमाज केवळ शुक्रवारच्या दिवशी दुपारी किंवा ईदच्या वेळीच होते, प्रतिदिन नाही. (वर्षातील ३६५ पैकी एक दिवस गुन्हा करत असीन, तर चुकीचे काय, असे म्हणण्यासारखे हे विधान आहे ! - संपादक) भारतात प्रत्येक धर्माचे सण रस्त्यावरच साजरे केले जातात, नाही का ? तुम्ही ते पहात नाही; तुम्ही त्याकडे डोळेझाक करता.

३. जर तुम्ही म्हणत असाल की, कुणाच्या सणाच्या वेळी मांसाची दुकाने बंद असावीत, तर रमझानच्या ३० दिवसांसाठी दारूची दुकानेही बंद करा. ३० दिवसांसाठी दारूची दुकाने उघडली जाऊ नयेत. (रमझानच्या काळात जिहादी आतंकवादी कृत्य करतांना लव्ह जिहाद, थूंक जिहाद, लँड जिहाद , चोरी, दरोडे, दंगली आदी गुन्हे करतांना ओवैसी आणि त्यांच्या बांधवांना त्यांच्या धर्माची आठवण होत नाही का ? - संपादक)

४. लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभांवरील भाषणांवर कोणताही आक्षेप नसतो; पण अजान आणि नमाज यांवर ते आक्षेप घेतात.

५. जेव्हा जेव्हा रमझान किंवा बकरी ईद यांसारखे मुसलमानांचे मोठे सण जवळ येतात, तेव्हा अजान आणि नमाज यांच्याशी संबंधित सूत्रे जाणूनबुजून उपस्थित केली जातात. अजानची अडचण, नमाजची अडचण ? शेवटी तुम्हाला झाले तरी काय आहे ? (हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदीसमोरून वाद्य वाजवत गेल्यावर मशिदीतून जाणीवपूर्वक त्यावर आक्रमणे केली जातात. त्याविषयी ओवैसी का बोलत नाहीत ? - संपादक)

हिंदु सणांच्या वेळी अंडी, मांस आणि चिकन यांच्या विक्रीवर लादल्या जाणार्‍या निर्बंधांवर प्रश्न उपस्थित करत ओवैसी यांनी विचारले की, हा कोणत्या प्रकारचा कायदा आहे ? तुमचा द्वेष केवळ मुसलमानांसाठी आहे. तुमचा द्वेष स्पष्टपणे दाखवतो की, तुम्ही या धर्माच्या अनुयायांना दाबून त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्हाला त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवायचे आहे. (पाकिस्तान, बांगलादेश येथे हिंदूंच्या संदर्भात काय चालू आहे, यावर ओवैसी का बोलत नाहीत ? अफगाणिस्तानातून हिंदूंना आणि शिखांना हद्दपार करण्यात आले. यावरही ओवैसी का बोलत नाहीत ? मुसलमानांना भारतात द्वेषाचा सामना करावा लागत असेल, दुय्यम दर्जाचे वाटत असेल, तर त्यांनी इस्लामी देशांत चालते व्हावे. त्यांना येथे कुणीही रहाण्यास सांगत नाही ! तसेच चांगुलपणाचा ठेका काय हिंदूंनीच घेतला आहे का ? या सद्गुणविकृतीमुळेच आज भारत खंडित झाला आहे, हे सेक्युलर हिंदूंनीही विसरू नये ! - संपादक)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi