मुंबई - येथील साकीनाका खैरानी रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये (सांडपाणी जाणारे गटार) पडून अस्लम अन्सारी (वय ४५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. ते भर पावसात भ्रमणभाषवर बोलत जात होते. मॅनहोलवर झाकण नसल्याने ते त्यात पडले आणि वाहून गेले.
संबंधित यंत्रणांनी त्यांना शोधून काढले; पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

