Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुसळधार पावसामुळे तुर्भे येथे रहिवासी वस्तीत पाणी तुंबले !

मुसळधार पावसामुळे तुर्भे येथे रहिवासी वस्तीत पाणी तुंबले !

वी मुंबई, २ जुलै (वार्ता.) - मुसळधार पावसामुळे तुर्भे येथील रहिवासी वस्तीत पाणी तुंबल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. वाशी-तुर्भे लिंक रोडपासून १ ते दीड मीटर खाली सखल भागांमध्ये हा परिसर वसवण्यात आला आहे.

परिणामी पावसाचे पाणी वाहून नेणारी गटारे आणखी २ - ३ फूट खाली आहेत. त्यामुळे येथे थोड्याशा पावसातही पाणी साचते. महानगरपालिकेने सखल भागातील पाणी गटारात सोडण्यासाठी पंप बसवले आहेत; पण पंप वेळेत चालू न केल्याने काही काळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पंप चालू केल्यानंतर पाणी हळूहळू ओसरले. त्यामुळे सुदैवाने येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले नाही; मात्र रस्त्यांमध्ये पाणी साचले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi