Dailyhunt
नागपूर येथील रा.स्व.संघाच्या मुख्यालयात किरणोत्सर्गी पदार्थ पेरल्याची धमकी !

नागपूर येथील रा.स्व.संघाच्या मुख्यालयात किरणोत्सर्गी पदार्थ पेरल्याची धमकी !

नागपूर - पोलिसांना शहरातील अनेक ठिकाणांना किरणोत्सर्गी पदार्थांद्वारे लक्ष्य करण्यात आल्याच्या धमक्या प्राप्त झाल्या आहेत. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाचाही समावेश आहे.

त्यामुळे नागपूर शहरात उच्च सुरक्षा सतर्कतेचा ('हाय अलर्ट'चा) आदेश देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंघल यांच्या नावे एक निनावी पत्र आले असून त्यात हा दावा करण्यात आला. हे पत्र 'डी.एस्.एस्.' नावाच्या एका संघटनेच्या वतीने पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी अन्वेषण करण्यासाठी आतंकवादविरोधी पथक आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांना पाचारण करण्यात आले आहे.

पोलिसांच्या सूत्रांनुसार 'सीझियम-१३७' नावाची अत्यंत धोकादायक किरणोत्सर्गी पावडर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पेरण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपींनी हा किरणोत्सर्गी पदार्थ एका कर्करोग रुग्णालयातून मिळवल्याचा दावा केला आहे. प्रशासनाला आव्हान देत पत्रात पुढे असे नमूद केले आहे की, संपूर्ण नागपूर शहर आता किरणोत्सर्गाच्या धोक्याखाली आहे.

अन्वेषण यंत्रणांनी केलेल्या प्राथमिक अन्वेषणामध्ये आतापर्यंत किरणोत्सर्गी पदार्थांचे कोणतेही अंश आढळून आलेले नाहीत. यावरून हा केवळ खोडसाळपणा असू शकतो, असा अनुमान वर्तवला जात आहे.

१. महाल भागात असलेले संघाच्या मुख्यालय

२. रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर

३. गणेश पेठेतील भाजपचे कार्यालय

४. 'ऑरेंज' आणि 'ॲक्वा' या दोन्ही मार्गांवर धावणार्‍या मेट्रो रेल्वे

५. संघ आणि भाजप कार्यालयांजवळील मार्गांवर धावणार्‍या बस

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi