'१३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे 'सनातन राष्ट्र शंखनाद' महोत्सव झाला. या महोत्सवात सादर केलेल्या 'स्वसंरक्षण प्रशिक्षण' आणि 'शस्त्रकला' यांच्या प्रात्यक्षिकांचे केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
याचा काही भाग आपण ८ एप्रिल या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.
भाग २
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1027273.html
३ आ. शस्त्रविद्या आणि युद्धकला यांची प्रात्यक्षिके प्रस्तुत होत असतांना सूक्ष्म स्तरावर घडलेली ठळक सूत्रे !
३ आ १. विविध शस्त्रकलांचे क्षात्रभावाने केलेले प्रस्तुतीकरण : यामध्ये लाठी, भाला, दांडपट्टा आणि ढाल-तलवार चालवण्याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. प्रात्यक्षिके दाखवणार्यांमध्ये गुरुकुलातील विद्यार्थी होते, तसेच विद्यार्थिनीही होत्या. लाठीचे द्वंद्व, ढाल-तलवार घेतलेल्या व्यक्तीवर चहूबाजूंनी तलवारीने आक्रमण झाल्यास त्याचा सामना करणे इत्यादी प्रात्यक्षिके पहातांना धर्मप्रेमींची दृष्टी त्या प्रात्यक्षिकांवर खिळून राहिली होती. असे वाटत होते, 'शिवकालीन बाजीप्रभु देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, शिवा काशीद, सरसेनापती प्रतापराव गुजर हे मावळेच व्यासपिठावर अवतरले आहेत.' तसेच 'झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तिची नारी सेना यांनी विविध शस्त्रांचा वापर करून कशा प्रकारे इंग्रजांना धूळ चारली होती', याचेही स्मरण ही प्रात्यक्षिके पाहून झाले.
३ आ २. जयघोष आणि पार्श्वसंगीत यांचा सूक्ष्म स्तरावरील परिणाम : 'जय भवानी, जय शिवाजी ।' आणि 'धर्मवीर संभाजी महाराज की जय ।' या क्षात्रभावाने केलेल्या जयघोषांमुळे जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पार्श्वसंगीतातून मारक नादलहरी प्रक्षेपित झाल्यामुळे या नादलहरींच्या तालावर विद्यार्थी लयबद्धरित्या शक्तीचे प्रदर्शन एका विशिष्ट गतीने करत होते. शक्ती आणि गती यांच्यामध्ये समन्वय साधल्यामुळे या युद्धकलेचे प्रदर्शन करतांना शस्त्रांतून मारक स्वरूपातील धर्मशक्तीचा प्रवाह सुरळीतपणे प्रक्षेपित होत होता.
३ आ ३. 'सव्यसाचि गुरुकुलम्'चे प्रधान आचार्य लखन जाधव यांनी शस्त्रकलेच्या प्रात्यक्षिकांमुळे होणार्या लाभांविषयी उत्कृष्टरित्या वर्णन करणे : 'भारतीय संस्कृती, राष्ट्र आणि धर्म' यांच्या संपूर्ण रक्षणासाठी शास्त्रांसह शस्त्रांच्या प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन होणेही अत्यावश्यक आहे. 'धैर्य, शौर्य आणि साहस' यांचा संगम शस्त्रधारण केल्यामुळे होतो. याविषयी 'सव्यसाचि गुरुकुलम्'चे प्रधान आचार्य श्री. लखन जाधव यांनी मारक शैलीत निवेदन करून उत्कृष्टरित्या वर्णन करून सांगितले. त्यामुळे धर्मपे्रमी हिंदुत्वनिष्ठांमध्ये क्षात्रचेतना जागृत झाली.
३ आ ४. 'सव्यसाचि गुरुकुलम्'चे प्रधान आचार्य लखन जाधव यांनी सादर केलेले दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक : 'सव्यसाचि गुरुकुलम्'चे प्रधान आचार्य लखन जाधव यांनी दांडपट्ट्याचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करत भूमीवर ठेवलेली लिंबे छेदून दाखवली. यातून त्यांच्यामधील शस्त्रकलेतील प्राविण्याची प्रचीती आली, तसेच त्यांच्यातील एकाग्रता आणि शस्त्रकलेतील निपुणता हे गुण जाणवले.
३ इ. शस्त्रकलेचे प्रस्तुतीकरण करणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सत्कार सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी करणे : 'जेव्हा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी 'सव्यसाचि गुरुकुलम्'चे प्रधान आचार्य श्री. लखन जाधव यांचा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला, तेव्हा धर्मलोकातील धर्मविरांचा सन्मान वीर हनुमानाने केला', असे जाणवले. त्या वेळी उच्च स्वर्गलोक आणि महर्लाेक यांच्यामध्ये स्थित असलेल्या धर्मलोकातील धर्मविरांनी कार्यक्रमस्थळी प्रात्यक्षिके सादर केलेल्या विरांवर पुष्पवृष्टी केल्याचे जाणवले.
टीप : शत्रूशी लढण्यासाठी केवळ शारीरिक बळ पुरेसे नसून आध्यात्मिक बळही मिळणे आवश्यक आहे. धर्मप्रेमी गुरुकृपायोगानुसार साधना करत स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके करतात. त्यामुळे त्यांना दैवी शक्तींचे साहाय्य अधिक प्रमाणात प्राप्त होते.
टीप - उच्च स्वर्गलोक आणि महर्लाेक यांच्या मधला लोक
कोणत्याही प्रकारचे स्वसंरक्षण किंवा शस्त्रकला यांचे प्रात्यक्षिक परिणामकारक होण्यासाठी त्याच्यामध्ये पुढील घटक असणे आवश्यक आहे.
त्याद्वारे समस्त धर्मद्रोही होतात त्रस्त ।।
धर्मराज्याच्या स्थापनेचे प्राप्त होता ब्रह्मास्त्र ।
अधर्मी शक्तींचा होतो संपूर्णपणे अस्त' ।।
(क्रमशः)
- सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १४.१२.२०२५, वेळ : दुपारी २.३० ते सायंकाळी ८ आणि कालावधी ५ घंटे ३० मिनिटे)

