काठमांडू (नेपाळ) - नेपाळमधील कोशी प्रांतातील सुनसरी जिल्ह्यात कावड यात्रेच्या वेळी भोंग्यांच्या आवाजावरून काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी केलेल्या आक्रमणानंतर झालेल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केला.
यात आतापर्यंत ओमप्रकाश मेहता आणि १५ वर्षीय गणेश यादव यांच्यासह ३ हिंदूंचा मृत्यू झाला. ही दंगल अद्याप शमलेली नसून ती मधेश प्रांतातील सिरहा, धनुषा, पर्सा, सप्तरी आणि बीरगंज या जिल्ह्यांपर्यंत पसरली आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नेपाळ प्रशासनाने बाधित भागांत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली असून नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ सैन्य यांना सतर्क रहाण्याचा आदेश दिला आहे. पंतप्रधान बालेन शहा यांनी देशाला संबोधित करत शांतता आणि धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन केले असून घटनेच्या निष्पक्ष अन्वेषणासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
🚨 Kathmandu (Nepal): Violence Continues After Attack on Hindu Religious Procession 🚨
🔹 3 Hindus reported dead so far.
🔹 Curfew imposed in 6 districts of Nepal bordering India.
📉 Despite making up 81% of the population (with Muslims at just 5%), Hindus continue to face… pic.twitter.com/xDRl10CtMX
- Sanatan Prabhat (@SanatanPrabhat)
भारत-नेपाळ सीमेला (विशेषतः बिहार राज्याला) लागून असलेले सुनसरी, पर्सा, धनुषा आणि सिरहा हे जिल्हे व्यापारी दृष्टीने संवेदनशील मानले जातात. जनकपूरधम, गोलबाजार, लहान, बीरगंज, राजविराज आणि बोदे बर्साइन या संवेदनशील भागांमध्ये नागरिकांच्या हालचालींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. संचारबंदी आणि मुख्य रस्ते बंद असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. भारत-नेपाळ सीमा मार्गावर अत्यंत कडकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. संवेदनशील भागांत सैन्याकडून ध्वजसंचलन आणि हेलिकॉप्टरद्वारे हवाई देखरेख केली जात आहे.
या भीषण हिंसाचारानंतर नेपाळमधील बालेन शहा सरकारवर तीव्र टीका होत आहे. वेळीच राजकीय आणि प्रशासकीय पावले न उचलल्यामुळेच ही हिंसा ६ शहरांमध्ये पसरल्याचा आरोप माजी पंतप्रधान पुष्पकमल दहाल आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांनी केला आहे.
देवानगंज ग्रामीण नगरपालिकेने पोलीस गोळीबारात मारल्या गेलेल्या स्थानिकांना स्थानिक पातळीवर 'हुतात्मा' घोषित केले असून नेपाळ सरकारकडे त्यांना अधिकृत हुतात्मा दर्जा आणि प्रत्येकी १० लाख लाख रुपयांच्या साहाय्याची मागणी केली आहे.

