Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nepal Flood : नेपाळमधील पुरात आतापर्यंत २८९ जणांचा मृत्यू

Nepal Flood : नेपाळमधील पुरात आतापर्यंत २८९ जणांचा मृत्यू

काठमांडू (नेपाळ) - नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे आतापर्यंत २८९ लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच १ सहस्र ५०० लोक अजूनही बेपत्ता आहेत. यात ३०० हून अधिक भारतीय आहेत.

हेलिकॉप्टरद्वारे लोकांचा शोध घेऊन त्यांची सुटका केली जात आहे. नेपाळी सैन्याने रसुवा येथील टिमुरे येथून सकाळी ११६ लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. यात ९५ नेपाळी आणि २१ भारतीय आहेत.

तिबेटमधील ग्यिरोंग काउंटीमध्ये झालेल्या भूस्खलनानंतर बेपत्ता झालेल्यांची संख्या ५५८ झाली आहे. यांमध्ये २६० परदेशी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळमध्ये ५७९ पर्यटक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये ४६६ परदेशी नागरिकांचा समावेश होता.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी ते आणि काही स्वयंसेवक यांना तिबेटच्या ग्यिरोंग प्रदेशात प्रवास करण्याची अनुमती देण्याचे आवाहन अधिकार्‍यांना केले आहे. सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गटातील ८० सदस्यांशी अद्याप संपर्क झालेला नाही. बेपत्ता झालेल्यांविषयी माहिती गोळा करण्यासाठी आणि पीडित कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी त्यांना ग्यिरोंगला जायचे आहे.

भारताने नेपाळला साहित्य घेऊन दुसरा साठा पाठवण्यात आला आहे. भारतीय वायूदलाच्या विमानाने पाठवलेल्या या साहित्यात ३७.५ टन अत्यावश्यक औषधे आणि अन्नधान्याच्या पाकिटांचा समावेश आहे. यापूर्वी विमानाद्वारे १० टन साहित्य आणि अत्यावश्यक औषध पाठवण्यात आले होते. भारताने म्हटले आहे की, ते नेपाळ सरकारच्या संपर्कात असून पूरग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करत राहील.

पूर आणि भूस्खलनानंतर चीनने नेपाळला वेळेवर सूचना न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्ता यांची हानी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. चीनने आता या प्रकरणी स्पष्टीकरण जारी केले आहे. नेपाळमधील चिनी दूतावासाने स्पष्ट केले की, चीनने कोणतीही माहिती लपवली नाही. चीनकडून पूर्वसूचना न मिळाल्यामुळे किंवा धरण फुटल्यामुळे पूर आला, असे म्हणणे चुकीचे आहे. (चीनच्या या म्हणण्यावर कोण विश्वास ठेवणार ? - संपादक)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi