Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नेपाळमध्ये मृतांचा आकडा १ सहस्र १२७ वर !

नेपाळमध्ये मृतांचा आकडा १ सहस्र १२७ वर !

काठमांडू (नेपाळ) - नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरातील मृतांचा आकडा १ सहस्र १२७ वर पोचला आहे, तर ४ सहस्र ८०० हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. सुरक्षादलांकडून शोधकार्य सातत्याने चालू आहे.

नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १ सहस्र ११३ मृतदेहांचे शवविच्छेदन आणि कायदेशीर ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

यापैकी ९५ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. नातेवाईकांना आपल्या माणसांचा शोध घेणे सोपे जावे, यासाठी नेपाळ पोलिसांनी ९११ अज्ञात मृतदेहांची छायाचित्रे आणि तपशील आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित केले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi