मुंबई - राज्यातील वीजटंचाई, वाढती वीज मागणी आणि वीजनिर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्ो यांमागे निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा पुरवठा हेच प्रमुख कारण आहे, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या वेळी केला.
अशा निकृष्ट कोळसा पुरवठादारांना काळ्या सूचीत टाकण्याची मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य करत कोळशाच्या योग्य नमुन्यांविषयी केंद्रीय कोळसा मंत्र्यांसोबत बैठक झाल्याचे सांगितले.

