Dailyhunt
निश्चय आणि श्रद्धेची परीक्षा घेणारे योगतज्ञ प.पू. दादाजीवैशंपायन यांचे वर्ष २०१६ मधील हरिद्वारचे कठीण अनुष्ठान !

निश्चय आणि श्रद्धेची परीक्षा घेणारे योगतज्ञ प.पू. दादाजीवैशंपायन यांचे वर्ष २०१६ मधील हरिद्वारचे कठीण अनुष्ठान !

'वर्ष १९७५ पासून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची साधना चालू आहे, ती साधकांना त्यांचे गुरु विष्णुरूपी 'भगवान आनंदस्वामीजी हिमालयवासी' यांचे दर्शन घडवण्यासाठी ! 'दादाजींच्या या प्रयत्नात आपलाही 'खारी'चा सहभाग असावा', अशी साधकांची इच्छा होती.

त्यातून एक समूह पुढे आला. त्यांनी १२.११.२०१६ ते ४.१२.२०१६ या कालावधीत असे २३ दिवस श्रीक्षेत्र हरिद्वार येथे उग्र साधना केली, त्याचा हा वृत्तांत !

गुरुवार, १० नोव्हेंबर या दिवशी आम्ही मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून हरिद्वार ए.सी. एक्सप्रेसने निघून ११ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १.३० वाजता हरिद्वारला पोचलो. 'कनखल' भागातील संन्यास आश्रम रोडवरील 'गिरीशानंद आश्रम ट्रस्ट, सुरतगिरी बंगला' या आश्रमात आम्ही एकूण १८ साधक दुपारी २ वाजता पोचलो.

२ अ. आहार

१. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने स्नान करूनच एक कप चहा

२. दुपारी भूमीवरील जप आणि जल जप यांच्यामध्ये २ फळे अन् १ कप चहा

३. जल तपानंतर १ कप चहा

४. रात्री आश्रमातील भोजन

या व्यतिरिक्त बाहेरील इतर कोणतेही खाद्य किंवा पेय वर्ज्य होते.

२ आ. जप

१. भूजप (भूमीवरील) : ४ घंटे

२. जलजप : ४ घंटे

सर्व जप केवळ अंतर्वस्त्रावर (अंडरपँट वरच) करायचा होता.

गेल्यावर एक घंटा विश्रांती घेऊन आम्ही तीन वाजता चाचणीसाठी पाण्यात उतरलो. छातीपर्यंत पाणी येईल, इतक्या पाण्यात बसून अर्धा घंटा साधना केली. हरिद्वारची थंडी, त्यात बर्फासारखे थंड पाणी ! अर्ध्या घंट्यातच आम्ही सारे गार झालो. आम्ही होतो, तेव्हा हरिद्वारला १० सें. ते १४ सें. इतके किमान तापमान असायचे.

सूर्याचा उदय - अस्ताचा अंदाज घेऊन आम्ही नामजपाच्या पुढील वेळा ठरवल्या.

अ. भूमीवरील जप : सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत.

आ. जल जप : सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत

आज वैशाख पौर्णिमा (बुद्धपौर्णिमा, १.५.२०२६) या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जयंती आहे. त्यानिमित्त सौ. विजया भूपेन पांचाळ यांनी केलेली कविता पुढे दिली आहे.

वैशाखातील पुनव (टीप १) होती ।
होता बृहस्पतिवार (टीप २)।।
सायंकाळी धूसर धूसर ।
तांबूस किरण ते क्षितिजावर ।। १ ।।

वनराईतूनी लहर हवेची ।
घुमवित होती शीळ मनोहर ।।
आला तो क्षण, आला तो क्षण ।
सांगत होती सर्वां अवखळ ।। २ ।।

कणखर खेडे देशावरचे ।
नाव तयाचे होते नेरे (टीप ३)।।
जणू 'कन्हैया…' साद घालते ।
कान्हा लवकर ये रे ये रे ।। ३ ।।

गणेशशास्त्री (टीप ४) नेरेवासी ।
वेदमहर्षि धन्वन्तरीही ।।
भार्या सावित्रीच्या (टीप ५) उदरी ।
अवतरिले ऋषिकेश तत्क्षणी ।। ४ ।।

तेजस्वी त्या वदनप्रभेने ।
धन्य वंश वैशंपायन ।।
त्या तेजाने लज्जित झाला ।
पुनवेचा तो रजनी प्रियकर (टीप ६) ।। ५ ।।

पाहूनी लोभस राजस कांती ।
लखलखती नेत्रांच्या ज्योती ।।
'श्रीपाद' (टीप ७) नामे वदली माता ।
स्मरूनी स्वप्नीच्या दृष्टांता (टीप ८)।। ६ ।।

उग्र कठोर जपा-तपाने ।
ऋद्धी-सिद्धींना दासी करूनी ।।
सार्थ नाम ते केले त्यांनी ।
'लक्ष्मीसिद्धि' (टीप ९) ही प्राप्त करूनी ।। ७ ।।

भक्तजनांच्या संकटी धावूनी ।
कुणा रक्षूनी मृत्यूपासूनी ।।
प्रसिद्ध 'दादाजी' या नावे ।
विश्वासा सर्वांच्या मिळवूनी ।। ८ ।।

जन्मदिनी मग दादाजींच्या ।
वैशाखातील त्या पुनवेच्या ।।
साधक स्मरती पावन चरणां ।
मनी दाटती भाव-भावना ।। ९ ।।

टीप १ - पुनव : पौर्णिमा
टीप २ - बृहस्पतिवार : गुरुवार
टीप ३ - नेरे : योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा जन्म नेरे (तालुका पनवेल, जिल्हा रायगड) येथे झाला.
टीप ४ - गणेशशास्त्री : योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या वडिलांचे नाव
टीप ५ - सावित्री : योगतज्ञ दादाजींच्या आईचे नाव
टीप ६ - पुनवेचा तो रजनी प्रियकर : पौर्णिमेचा चंद्र
टीप ७ - श्रीपाद : योगतज्ञ दादाजींचे मूळ नाव
टीप ८ - स्वप्नीच्या दृष्टांता : योगतज्ञ दादाजींच्या जन्मापूर्वी त्यांच्या आईला देवाने स्वप्नदृष्टांद्वारे सांगितले होते, 'तुझ्या पोटी एक सत्पुरुष जन्माला येईल.'
टीप ९ - लक्ष्मीसिद्धि : योगतज्ञ दादाजींना योगसाधनेने 'लक्ष्मीसिद्धि' प्राप्त झाली होती.'
-सौ. विजया भूपेन पांचाळ (वय ७५ वर्षे), बोरीवली, मुंबई. (२७.४.२०२६)

३ अ. पहिला दिवस

३ अ १. प्रचंड थंडीत पार पडलेला भूजप : १२ नोव्हेंबरला आमची साधना चालू झाली. आम्ही सकाळी ६ वाजता शूचिर्भूत होऊन गंगेकाठी भूजपासाठी जमलो. प्रारंभी 'ॐ आनंदं हिमालयम्…', हा श्लोक म्हणून, तसेच दादाजींचा जयजयकार करून साधनेस प्रारंभ केला. ७.३० वाजता सूर्याेदय झाला. ६ ते ८.३० पर्यंत थंडीने आणि झोंबर्‍या वार्‍याने आमची परीक्षा घेतली. सर्व जण कुडकुडत होतो. सूर्य वर आला आणि त्याची उष्णता मिळू लागली. १० वाजेपर्यंतचा जप पूर्ण झाला.

३ अ २. बर्फासारख्या गार पाण्यात पार पडलेला जलजप : फलाहार घेऊन आम्ही गंगेच्या काठी जमलो. अत्यंत मनःपूर्वक गंगामाईची प्रार्थना करून ओटी भरली. सकाळी बरोबर १०.३० वाजता जलजपास प्रारंभ झाला. आधीच कडाक्याची थंडी, बर्फासारखे गार पाणी, त्यातच झोंबरे गार वारे ! १०.३० ते १२.३० वाजेपर्यंत वेळ छान गेला. १२.३० वाजता सूर्य झाडाआड गेला. तेव्हापासून दुपारी २.३० वाजेपर्यंत पाण्यात उभे रहाणे अशक्य होते; पण सर्व जण निश्चयाने आणि श्रद्धेने उभे होते. या थंड वार्‍याशी झगडत जप करत होतो. एकदाचे २.३० वाजले. आम्ही पाण्याबाहेर यायला लागलो; पण पाय बधीर झाले होते. घाटाच्या सात-आठ पायर्‍याही ताठ चालत वर येता येत नव्हते. कसे बसे पाण्याबाहेर आलो. चहा घेतला. तीन तीन स्वेटर घातले आणि अंथरुणावर पहुडलो.

पहिल्या दिवशीच आमच्यातील एक साधक आजारी पडला. त्याला हुडहुडी भरून ताप आल्याने त्याने अनुष्ठानातून सखेद माघार घेतली.

३ आ. दुसरा दिवस : दुसर्‍या दिवशी बरोबर ६ वाजता आम्ही भूजपास प्रारंभ केला. तेव्हा चांगलेच वारे सुटले होते. आमच्यातील प्रकृतीने सर्वाेत्तम असणारा साधकच ताप आल्याने बाहेर पडला; पण लवकरच परत येऊन जपात सामील झाला. आमच्या समोरच १५ ते २० फुटांवर गंगा नदी होती. येणारे जाणारे सर्व यात्रेकरू नखशिखांत (डोक्यापासून पायापर्यंत) पूर्ण गरम कपड्यांत होते. आमच्या समोरून जातांना ते थोडा वेळ थांबत आणि नमस्कार करून पुढे जात होते. जप करतांना आम्हाला हुडहुडी भरत होती; पण आपली फजिती लपवण्यासाठी न कळत मोठ्याने मंत्रोच्चार होत होता. जलजपही मोठ्या अडचणींवर मात करून (मुश्किलीने) पार पडला.

३ इ. साधनेचे सहा दिवस योग्य प्रकारे पार पडणे : तिसर्‍या दिवशी जलजप चालू करणार, तोच प.पू. दादाजींचा भ्रमणभाष आला की, दोन साधकांना त्रास होण्याची शक्यता आहे, तरी ज्यांना त्रास होत असेल, त्यांनी आज काठावर उभे राहून जप करावा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व जण पाण्यात उतरले होते. केवळ दोनच साधक पाण्यात यायचे होते. नेमके तेच आज जप करतांना काठावर उभे राहिले. असे करता करता साधनेचे सहा दिवस पार पडले.

३ इ १. साधनेत पाळायचे बंधन : साधनेत एक बंधन होते. जप करतांना लघुशंका लागल्यास नंतर पाय धुऊन जपात सामील व्हायचे. शौचास जावे लागल्यास थंड पाण्याने अंघोळ करून मगच जपात सामील व्हायचे. ज्याला कुणाला शौचाची भावना होई, त्याला ब्रह्मांड आठवत असे.

३ इ २. प्रतिदिन औषधे घेऊन अनुष्ठानास जाणे : प्रतिदिन रात्री जेवण झाल्यावर आमच्यातील एका साधकाच्या खोलीत आम्ही जमत असू. त्यांना औषधांची चांगली माहिती होती. कुणाच्या पोटर्‍या, कुणाचे पाय, कुणाची पाठ, मान दुखत असे, तर कुणाला तापही आलेला असायचा. प्रत्येक जण औषधाची गोळी घेऊन आपापल्या खोलीत परतायचा. या गोळ्यांमुळे आणि दिनचर्या पालटल्यामुळे सर्वांच्या शरिराची रासायनिक प्रक्रियाच पालटून गेली होती.

३ ई. सातवा दिवस : अनुष्ठानाच्या ७ व्या दिवशी जलजप करतांना आम्हाला आमच्या बाजूच्या भिंतीला चिकटून सर्पराज दिसले. दादाजींना निरोप दिला. जलजप चालू होऊन थोडा वेळ झाला होता. एक साधक घाबरला. तो म्हणाला, ''मी जपातून माघार घेतो आणि घरी परत जातो.'' त्याला अंग पुसून काठावर उभा केला आणि धीर दिला. थोड्याच वेळात त्याचे मन स्थिर झाले आणि तो परत पाण्यात येऊन जप करू लागला. त्याला दुखण्यापेक्षा भीतीनेच अधिक घेरले होते.

३ उ. जपाच्या आठव्या दिवशी एका साधकाला तातडीने घरी परतावे लागले. दादाजींचा ज्येष्ठ साधकांना निरोप होता की, एकाग्रता वाढवा. कंटाळा करू नका. नेटाने जप चालू ठेवा.

३ ऊ. नववा दिवस

३ ऊ १. थंडीमुळे पायांचा त्रास चालू होणे : २० नोव्हेंबर या दिवशी नवीन नियम लागू झाला. दिवसातील तीन चहांपैकी एक चहा बंद. आम्ही फलाहारानंतरचा चहा बंद केला. तो जलजपानंतर घ्यायला लागलो. भूजपात झोंबर्‍या वार्‍यांनी (सकाळी ६ ते ९) सर्वांची पळताभुई थोडी केली. ९ ते १० हा वेळ त्यातल्या त्यात सुसह्य झाला. आज जलजपात पाय चांगलेच तक्रार करू लागले.

आज जलजपानंतर लगेचच खोलीवर जाऊन पलंगावर पडण्याऐवजी उन्हातच अर्धा घंटा बसलो आणि आश्चर्य म्हणजे हुडहुडी एकदम थांबली.

३ ऊ २. जड देहाचे दोष जाण्यासाठी प.पू. दादाजींनी अधिकचा दीड घंटा जप करण्यास सांगणे आणि त्यासाठी खोलीत बसून जप करण्यास अनुमती देणे : त्या दिवशी दादाजींचा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, ''साधना सुसह्य होण्यासाठी जड-देहाचे दोष जावेत; म्हणून आणखी दीड घंटा जप करा.''

गंगेकाठी संध्याकाळी ५ वाजता या अधिकच्या जपासाठी बसलो. ६ वाजल्यावर डास आणि थंडीचा पुष्कळ त्रास होत होता. दोन दिवसांनी ही गोष्ट दादाजींच्या कानावर घातली. त्यानंतर दादाजींनी हा जप आपापल्या खोल्यात बसून करायला अनुमती दिली.

३ ए. दहावा दिवस

३ ए १. 'कोट्यवधी लोकांमधून गंगा नदीच्या सान्निध्यात साधना करण्यास मिळणे, हे भाग्याचे आहे', असे जाणवणे : २१ नोव्हेंबर या दिवशी जलजपाच्या वेळी समोरची हिरवीगार वनश्री बघून मनात दोन विचार आले.

अ. 'प.पू. दादाजी वैशंपायन यांचे नगर जिल्ह्यातील शेवगावही असेच वनश्रीने नटलेले हिरवेगार असावे', असे मला वाटले.

आ. भारतातील कोट्यवधी लोकांतील आपण १८ जण आज हरिद्वारला येऊन गंगामाईच्या पात्रात आणि तिच्या सान्निध्यात साधना करत आहोत. नाशिकहून दादाजी आणि हिमालयातून श्रेष्ठी अन् शक्तीदेवता आपल्यावर लक्ष ठेवत आहेत. आपले भाग्य किती थोर !

३ ए २. आधी मनात आलेल्या नकारात्मक विचारांविषयी प.पू. दादाजींची मनाने क्षमा मागणे आणि नवीन जोमाने साधना चालू ठेवणे : पहिल्या दिवशी दाणादाण उडाल्यावर आम्ही हताश झालो होतो, मनात उलट-सुलट विचार आले होते, त्याची आम्हाला लाज वाटली. आम्ही मनोमन दादाजींची क्षमा मागितली आणि नवीन जोमाने साधना पुढे चालू ठेवली.

(क्रमश:)

लेखक : श्री. दिवाकर फडके, ठाणे (वर्ष २०१६)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Sanatan Prabhat Marathi