पुणे - पुणे विभागातील नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये ४० उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्याने ते अपात्र ठरले आहेत. (नियमाचे उल्लंघन करणारे लोकप्रतिनिधी जनतेसमोर काय आदर्श निर्माण करणार ?
- संपादक) अपात्र उमेदवारांची सूची संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यालय येथे दिली आहे. यात पुणे महापालिकेच्या २२, पंढरपूर नगर परिषदेच्या १५ आणि अक्कलकोट नगर परिषदेच्या ३ उमेदवारांचा समावेश आहे. सुनावणीसाठी बोलावल्यावर त्यांनी समाधानकारक खुलासा दिला नाही. निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याप्रकरणी ते ३ वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी दिली.

